
दैनिक चालु वार्ता
औरंगाबाद प्रतिनिधी
रामेश्वर केरे
सिल्लोड :- आज शनिवार रोजी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी जंजाळा किल्लाच्या जवळपास 6 किलोमीटर परिघातात पायी चालत संपूर्ण किल्याची पाहणी केली. तसेच याबाबत स्थानिक नागरिक व इतिहास कारांकडून सविस्तर माहिती जाणून घेतली. यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी निर्देश दिले. यावेळी सिल्लोडचे उपनगराध्यक्ष अब्दुल समीर, तहसीलदार विक्रम राजपूत, गटविकास अधिकारी अशोक दांडगे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता किशोर मराठे, शाखा अभियंता कर्णविशाल चाटे, मुख्यमंत्री सडक योजनेचे अभियंता सुनील देवरे जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता कल्याण भोसले, अशोक देशमुख, जी. आर. पाटील, अजिंठा पोलीस ठाण्याचे एपीआय अजित विसपुते, डॉ. संजय जामकर, कृउबा समितीचे संचालक दामूअण्णा गव्हाणे, नगरसेवक मनोज झंवर, नानेगाव जंजाळा चे सरपंच फकिरा पठाण, चेअरमन करीम पठाण, आयुब पठाण, कालु पठाण आदींची उपस्थिती होती.