
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी अरुण भोई
‘अध्यात्मिक मार्ग दाखविणारेसंत तुकाराम महाराज यांचे कार्य अलौकिक असून हे राज्यातील महत्त्वाचे व्यासपीठ आहे. अखंड हरिनाम सप्ताह म्हणजे वारकऱ्यांचा महाउत्सव असून संत विचारांची प्रेरणा देण्यासाठी हरीनाम सप्ताह गरजेचा आहे,’असे प्रतिपादन हभप सतिश महाराज साळुंखे यांनी केले. गुरुमहाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त काल्याचे किर्तन ह भ प सतीश महाराज साळुंखे यांनी कोशिंघर राजेगाव या ठिकाणी केले यावेळी दौंड बारामती इंदापूर मावळ वेल्हे अशा अनेक तालुक्यातून वारकरी सांप्रदायिक व भाविक भक्त या सप्ताहासाठी उपस्थित होते.
या सप्ताहासाठी महाप्रसादाचे देणगीदार रामचंद्र गणपत कडू ,श्यामराव ईश्वर कडू, यांच्यावतीने महाप्रसादाचा कार्यक्रम केला गेला यावेळी राजेगाव ग्रामपंचायतचे सरपंच प्रवीण लोंढे, गटनेते मुकेश गुणवरे,प्रहार जनशक्ती दौंड तालुका अध्यक्ष रमेश शितोळे, ग्रामपंचायत सदस्य रमेश जाधव ,संदीप भोसले, जयराम देवकाते, सोसायटी सदस्य शहाजी गुणवरे, माजी चेअरमन महादेव बगाडे, मा. उपसरपंच महेश कडू, युवा उद्योजक मनोज भोसले, सोसायटी चेअरमन सचिन जाधव, सोसायटी सदस्य अमोल मोरे, माजी चेअरमन दादासाहेब कडू, माजी उपसरपंच बबन कडू, व्यसन मुक्ती अध्यक्ष राजेंद्र कदम, ह-भ-प दिलीप मोरे, सुधीर पवार व सर्व ग्रामस्थ भाविक भक्त यावेळी उपस्थित होते.