
दैनिक चालु वार्ता
तालुका प्रतिनिधी आर्णी
श्री. रमेश राठोड
सावळी सदोबा :- आर्णी – केळापूर मतदार संघ हा विधानसभेसाठी अनुसूचित जमाती साठी राखीव असल्याने या मतदार संघावर मा.शिवाजीराव मोघे साहेब यांचा वर्चस्व राहिले आहे,परंतु गेल्या सात वर्षांपासून मोदी लाटेमुळे हा मतदार संघ मा.शिवाजीराव मोघे साहेब यांना गमवावा लागला आहे, त्यामुळे काँग्रेस पक्षाने आगामी जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये नविन व युवा नेतृत्वला संधी द्यावे, ही सर्व मतदार संघातील युवकांची मागणी आहे त्यामुळे पुढील काळात मा.शिवाजीराव मोघे साहेब यांचे पुत्र व जिल्हा काँग्रेस चे जिल्हा सरचिटणीस मा.जितेंद्र भाऊ मोघे यांना मतदार संघाचे नेतृत्व करायची संधी द्यावी ही सर्व तरुण वर्ग व कार्यकर्ते ची मागणी आहे असे पत्र परिषदेत बोलताना विधानसभा अध्यक्ष मा.स्वानंद भाऊ चव्हाण यांनी सांगितले
याचाच भाग म्हणून आगामी जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती,नगर परिषद निवडणुकीत काँग्रेस पक्षा ने तरुण वर्गाला पुढे करून पक्षनिष्ट अशा युवक कार्यकर्त्या ना निवडणुकीत संधी द्यावी अशी सर्व जनतेची अपेक्षा आहे,त्यामुळे भविष्यातील विधानसभा व लोकसभा निवडणुकीत युवक वर्गाचा फायदा होईल व पक्ष मजबुत व पक्षसंघटन वाढविणे सोपे होईल, देशात वाढती बेरोजगारी,महागाई, ही देशासमोरील सर्वात मोठी समस्या आहे, त्यामुळे पुढील काळात त्याचा संपूर्ण भारतात परिणाम पाहायला मिळणार आहे.
त्यासाठी केंद्रात सतेत असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या सरकार ला सत्तेवरून खाली खेचणे महत्वाचे आहे व ती टाकत फक्त युवक वर्गात असून जास्त युवकांची भर्ती करणे व निवडणुकीत युवकांना संधी देणे गरजेचे आहे असे प्रतिपादन यावेळी मा. स्वानंद भाऊ चव्हाण यांनी केले ,पुढील निवडणुकीत काँग्रेस पक्षाने युवकांना संधी द्यावी म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी समोर व पक्ष नेतृत्व समोर म्हणणे मांडणार असल्याचे यावेळी बोलतांना सांगितले