
दैनिक चालु वार्ता
शिरपूर प्रतिनिधी
महेंद्र ढिवरे
कुरखळी :- पशुसंवर्धन विभाग धुळे जिल्हा अग्रणी बँक व जोशाबा शेतकरी उत्पादक गट कुरखळी यांच्या संयुक्त विद्यमाने पशुधन साठी किसान क्रेडिट कार्ड शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सदर शिबिरात 205 लोकांनी नोंदणी केली त्यात एमसीएल परिवारा मधील सभासदांना देखील फायदा देण्यात आला व या कार्यक्रमास जिल्हा अग्रणी बँक प्रबंधक मनोज कुमार दास पशुसंवर्धन विकास अधिकारी धुळे डॉ. राजेंद्र लंगे , पशुधन विकास अधिकारी पंचायत समिती शिरपूर डॉ.एस के कुवर सिंधुबाई शेतकरी उत्पादक कंपनीचे चेअरमन श्री.दिपक पाटील साहेब तसेच कृषी विज्ञान केंद्र धुळे येथील कार्यक्रम समन्वयक डॉ. दिनेश नांद्रे व सहकार विकास महामंडळ पुणे विभागीय व्यवस्था पक श्री.एम.सी पाटील साहेब तसेच सेवानिवृत्त कृषी उपसंचालक श्री डी. यु बोरसे, निवृत्त कृषी अधिकारी बी.डी देसले परिसरातील सरपंच जि प सदस्य व गावातील नागरिक उपस्थित होते..
उपस्थित गावातील नागरिक
अवधूत मोरे, हिरामन कोळी, सुरेश मोरे, प्रताप भिल, सरपंच सिताराम भिल, प्रकाश रमण भिल, सुधीर मोरे , भगवंत मोरे, पोपट शिरसाठ, ग्रा प सदस्य जगदीश मोरे, नाना कोळी, कुरखळी ग्रामविकास मंचचे योगेश्वर मोरे, ग्रा प सदस्य आदेश भिल, मेहुल जगदेव, शरद जगदेव, आदित्य कोळी, विठ्ठल रामदास कोळी, रमेश कोळी, संजय मोरे, ज्ञानेश्वर मोरे , शिरपूर तालुक्यातील पशुपालक, तसेच जि प मराठी शाळेचे शिक्षक, आदर्श माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक व कर्मचारी, कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रामपंचायत कुरखळी यांचे सहकार्य लाभले.
–असे असेल क्रेडिट कार्ड लाभार्थ्यांना कर्ज
1.प्रती गाय/ म्हैस – 15000 प्रमाणे
२.बकरी/मेंढी पालन 12000 /-
3. 1000 पोल्ट्री पक्षी 15000/_
३.मत्स्य पालन युनिट मर्यादा प्रमाणे.
–या पशुपालकांचा केला सत्कार
१.युवराज धुडकू धनगर, कुरखळी
२.भारतसिंग मानसिंग राजपूत, आमोदे
३.रावसाहेब भास्कर पाटील, बाभूडदे
४.अर्जुन राजहंस माळी, वाघाडी
५.देवाजी उत्तम बोरसे, वाघाडी
६.हेमंत विश्वासराव सनेर, ताजपूरी
मनोगत
जोशाबा शेतकरी उत्पादक गटामार्फत जिल्ह्यातील सर्व पशुपालक, कुकूटपालन, शेळीपालन, मत्स्यपालन व इतर क्षेत्रातील शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान व विविध उपक्रमा द्वारे शेतकऱ्यांच्या विकासासाठी काम करत आहे !
रमेश जगदेव
अध्यक्ष
जोशाबा शेतकरी उत्पादक गट कुरखळी
संचालक कृषीरत्न शेतकरी उत्पादक कंपनी लि. शिरपूर