
दैनिक चालु वार्ता
परतुर प्रतिनिधी
नामदेव तौर
परतूर :- मकर सक्रांती निमीत्त परतुर नगराध्यक्षा सौ.विमलताई जेथलिया व परिवाराच्या वतिने आयोजीत हळदीकुंकुवाच्या कार्यक्रमाला रविवारी रोजी शहरातील महिला भगींनीनी प्रतिसाद दिला या निमीत्त आयोजीत कार्यक्रमात आपल्या भवना व्यक्त करतांना सौ. विमलताई जेथलिया यांनी उपस्थीत महिलांचे आभार मानत हळदीकुंकू हा स्त्रीच्या सौभागाचा व सन्मानाचा सण असल्याचे म्हणत हा भारतीय संस्कृतीचा सर्वात मोठा उत्सव असल्याच्या त्या म्हणाल्या. परतूर शहरातील बचपण इंग्लिश स्कुलच्या प्रांगणात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला शहरातील व ग्रामीण भगातील महिलांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.
कोरोनाचे नियम पाळत दिवसभर टप्प्या टप्याने या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमांच्या प्रवेश द्वारावरच कारोनाचे नियम पाळत सॅनिटाझर व मास्क वाटप करत कारोणाची जनजागृती करणारा संदेश आयोजकांच्या वतिने पाळण्यात आला होतां, जास्त गर्दी टाळत पन्नास पन्नास महिलांच्या टप्पा करत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी नगराध्यक्षा सौ.विमलताई जेथलिया सह त्याच्या सून सौ. शितलताई जेथलिया व प्रियाताई जेथलिया याच्यासह नगरसेविका संगीता भुजबळ, शांताताई हिवाळे , जिल्हा परिषद सदस्या प्रतिभाताई घनवट यांची प्रमुख उपस्तीती होती.
यावेळी पुढे बोलतांना सौ.विमलताई जेथलिया यांनी महिलांना मकर संक्रातीच्या शुभेच्छा व्यक्त करत या निमीत्त सर्व महिलांच्या विचारांचे देवाण घेवाण करता आले अशी भावना त्यांनी व्यक्त केली. दरम्यान यावेळी महिला भगिनींना हळदीकुंकू लावत व वाण भेट देण्यात आली,सर्वांसाठी केशर दुधाची व्यवस्था कार्यक्रमस्थळी करण्यात आली होती. कार्यक्रस्थळी महिला भगिनींसाठी सेल्फी पॉईंट देखील उभारण्यात आला होता. या ठिकाणावर उभे राहत महिलांनी फोटो काढण्याचा आनंद लुटला.