
दैनिक चालु वार्ता
पालघर मोखाडा प्रतिनिधी
अनंता टोपले
जव्हार :- आज दिनांक 16/01/2021 रोजी जव्हार तालुक्यातील नांदगाव पैकी राजेवाडी येथे आदिवासी हिरवा देव सेवाभावी संस्थेचे उद्धघाटन विक्रमगड विधानसभेचे कार्यसम्राट आमदार सूनीलजी भूसारा साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.यावेळी मोखाडा पंचायत समितीचे माजी सभापती प्रदीप जी वाघ,जव्हार पंचायत समितीचे उपसभापती रंधा साहेब,बेधडक रोखठोक आदिवासी संघाचे महाराष्ट्र राज्य संघटक अमोलभाई टोपले,कुणाल टोपले,सागर थोरात साहेब, कल्पेश जी ठानगे साहेब,जव्हार तालुका बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष एकनाथ दरोडा,सामाजिक कार्यकर्ते सचिन पाटील,उप अध्यक्ष अनंता धनगरे,पोलिस पाटील गोडे, गवारी,शिंगवे सर, विलास गावंढा सर ,पांडू भस्मे,काशिनाथ दरोडा,गणपत दोरे, सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष संजय जी भला,सचिव चंदर दोरे व पूर्ण सदस्य व मोठ्या प्रमाणात नागरिक हजर होते.
या वेळी विक्रम गड विधानसभेचे आमदार सुनिल जी भुसारा साहेब यांनी मोलाचे मार्गदर्शन करून तत्काळ देणगी सुद्धा या सेवाभावी संस्थेला दिली. यावेळी भुसारा साहेब यांनी बोलत असताना नांदगाव राजेवाडी(ठाकूर वाडी) येथे 5 लाख सभामंडप साठी देतो व 10 लाख रस्ता डांबरीकरण साठी देतो असे जाहीर करण्यात आले. यावेळी त्यांनी बोलत असताना तुम्ही समस्या घेऊन या मी तुमच्यासाठी 24×7 तास उपलब्ध आहे असे सांगितले यावेळी खरच आपला माणूस का म्हणतात याची जाणीव व मीटिंग ठिकाणी उपस्थित नागरिक यांच्याकडून ऐकायला मिळाली कार्यक्रम कोरोनाचे नियम पाळून मोठ्या उस्तहात कार्यक्रम पार पडला स्थानिक नागरिकांनी आमदार व जमलेल्या प्रमुख पाहुण्यांचे आभार मानले.