
दैनिक चालु वार्ता
कोल्हापूर प्रतिनिधी
शहाबाज मुजावर
कोल्हापूर :- पुरोगामी चळवळीतील ज्येष्ठ नेते व विचारवंत प्रा.नारायण ज्ञानदेव पाटील यांचे निधन झाले.त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना चार दिवसा पाठीमागे खासगी रुग्णालयात सरस्वती हॉस्पिटल कदमवाडी कोल्हापूर दाखल करण्यात आले होते. प्रा.पाटील यांच्यावर खास वैद्यकीय पथक त्यांच्यावर लक्ष ठेवून होते. प्रा.पाटील गेल्या दोन वर्षांपासून घरीच होते.राज्यातील परिवर्तन वादी चळवळीचे लढवय्या जेष्ठ नेते व शेतकरी कामगारांचे ज्येष्ठ नेते, राज्याचे माजी सहकारमंत्री आणि प्रदीर्घ काळ महाराष्ट्राचे विधानसभा सदस्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर अकादमी,समाजवादी प्रबोधिनी, अंधश्रद्धा निर्मूलन समिती ,शेतकऱ्यांच्या सामान्य माणसांच्या प्रश्नावर स्वतः रस्त्यावर उतरून लढाई करणारे लढवय्ये नेते. अशी त्यांची ओळख संपूर्ण महाराष्ट्रात होती. तसेच ते शहर माननीय शरद पवार यांचे जवळचे पाहुणे आहेत.
रयत शिक्षण संस्थेचे ते अध्यक्ष होते व त्यांनी अध्यक्ष असताना केलेले काम अलौकिक आहे.कोल्हापुरातील टोल हद्दपार करण्यात ज्यांचा सिंहाचा वाटा होता. पाटील यांना भाई माधवराव बागल पुरस्कार,स्वामी रामानंद तिर्थ विद्यापीठ नांदेडची डिलीट पदवीने सन्मानित करण्यात आले होते.केंद्र सरकारच्या राष्ट्रीय बियाणे महामंडळाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले होते.मध्यंतरी त्यांना कोरोनाची लागण झाली होती ,त्यावर ते मात करून पुन्हा त्यांची प्रकृती स्थिर झाली होती.आपल्या सर्वांचे भाई. एन.डी पाटील.यांचे वयाच्या 93 व्या वर्षी निधन झाले आहे दैनिक चालू वार्ता ग्रुप कडून त्यांच्या आत्म्यास भावपूर्ण आदरांजली.