
दैनिक चालु वार्ता
कंधार प्रतिनिधी
माधव गोटमवाड
कंधार :- तालुक्यातील बामणी ( प.क ) येथील एका गरीब शेतकरी कुटुंबात जन्म घेतलेला पैहिलवान म्हणून ज्याची तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात ओळख असलेले व बामणी गाव हे पहिलवानाचे गाव निर्माण करणारे गावातील शेकडो पैलवान असून त्यांच्यापैकीच एक पहिलवान अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत व शेतीवर अवलंबून असलेल्या एका शेतकऱ्याचा मुलगा व त्यांच्या वडिलांच्या शिकवणीवर लक्ष केंद्रित करून मनाशी जिद्द बाळगून आज त्यांनी वाशीम येथे विदर्भ योद्धा केसरी २०२२ विजय संपादन करून दोन किलो चांदीची गदा व रोख बक्षीस २१ हजार रुपये मिळवत त्यांनी विजय संपादन केल्याबद्दल त्यांचे कंधार तालुक्यातील बामणी (प.क ) या गावचे भूमिपुत्र असून त्याने गावचेच नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्राची मान उंचावेल असे त्यांनी विदर्भ योद्धा केसरी पुरस्कार मिळवत आपला विजय संपादन केल्याबद्दल त्यांच्या मूळ गावी व कर्मभूमी असलेल्या बामणी या गावी त्यांचा गावकऱ्यांच्या वतीने भव्य मिरवणूक काढत त्यांचा छत्रपती शिवाजी महाराज चौक व ग्रामपंचायत कार्यालय बामणी या ठिकाणी गावकऱ्यांच्या वतीने भव्य स्वागत व सत्कार करण्यात आला
यावेळी मारुतराव पाटील कदम पोलीस पाटील ,विक्रम पाटील बामणीकर मराठा महासंग्राम संघटना मराठवाडा अध्यक्ष , उत्तमराव पाटील वरपडे पोलीस उपनिरीक्षक नांदेड, अतुल वाघमारे सरपंच प्रतिनिधी ,सौ शोभाताई सटवाजी सांगळे उपसरपंच, जयसिंगराव पाटील कदम माजी सरपंच ,दतराम पाटील कदम तंटामुक्ती अध्यक्ष, मालोजी कदम ग्रामपंचायत सदस्य ,सटवाजी सांगळे, उत्तमराव सांगळे, प्रसराम तेलंग माजी तंटामुक्ती अध्यक्ष ,दिनानाथ सांगळे, मारुती जगताप ,भीमा महाराज गिरी , बालाजी कदम ,राम कदम, बाबाराजे जगताप, बालाजी पाटील पाडोरणे ,डॉ चंद्रभान धोंडगे ,श्रीराम पाटील शिराळे, रावसाहेब पाटील शिराळे, भगवान पाटील शिराळे ,गोविंदराव पाटील शिराळे ,बालाजी पाटील शिराळे, भागवत शिराळे ,पंडित पाटील शिराळे, दतराम पाटील शिराळे ,विठ्ठल पाटील शिराळे ,आनाजी पाटील शिराळे ,उत्तम बत्तलवाड ,आनंदा बत्तलवाड ,उत्तमराव शिंगारपुतळे यांच्यासह गावातील गावकरी व प्रतिष्ठित नागरिक तसेच महिला देखील मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित होत्या.