
दैनिक चालु वार्ता
औरंगाबाद जिल्हा प्रतिनिधी
अनिकेत संजय पुंङ
औरंगाबाद :- मकरसंक्रांतीच्या निमित्ताने हळदी – कुंकवासाठी बाहेर निघालेल्या महिलांचे दागिने पळवणारे चोरटे पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत . वाळूज एमआयडीसी परिसरात मकर संक्रांतीच्या दिवशी चार मंगळसूत्र चोरी झाल्याच्या घटना घडल्या . दुसऱ्या दिवशी शनिवारीदेखील एसटी कॉलनीत मंगळसूत्र चोरीचा प्रयत्न झाला . पण ज्या महिलेच्या गळ्यातलं मंगळसूत्र चोरण्याचा प्रयत्न चोराने केला , ती महिलाही धाङसी निघाली . तिच्या धाडसामुळे त्याचा हा प्रयत्न पुर्णपणे फसला .
काय घडलं नेमकं ?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , बजाजनगर येथील पुष्पा विजय निकम या अंगणात रात्री १०.३० वाजता मोबाइलवर बोलत होत्या . एक चोर धावत त्यांच्या दिशेने आला . अचानक पुष्पा यांच्या गालात चापट मारली . नंतर त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावण्याचा प्रयत्न करताच पुष्पा यांनी मोठ्या हिंमतीने चोरट्याची काँलर घट्ट पकडली . चोर-चोर असा आरडाओरडा सुरु केला . त्यांचा आवाज ऐकून शेजारी असलेले नागरिक मदतीला धावले . जमलेल्या लोकांनी चोराला चांगलाच चोप दिला .
लगेचच सदरील घटना वाळूज एमआयडीसी पोलिसांना कळवण्यात आली. त्यांनी गुन्हेगारस लगेच ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला .भारत राजू गडवे , असे या चोरट्याचे नाव असून नागरिकांनी त्याला धो धो धूतला आणि पोलिसांच्या हवाली केले . या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . या घटनेनंतर सदर महिलेचे परिसरात कौतुक होत आहे . महिलांनी थोडी हिंमत दाखवली तर अशा प्रकारच्या घटना करण्याची चोरांची हिंम्मत होणार नाही , अशा प्रतिक्रिया उमटत आहेत .