
दैनिक चालु वार्ता
नंदुरबार प्रतिनिधी
संदिप मोरे
नंदुरबार :- कापसाच्या गटाणी शोधुन काढल्या. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक हे आरोपीस अजमेर येथुन घेऊन मोरबी येथे पोहोचले. दोन्ही तपास पथकांनी संयुक्त कारवाई करुन आरोपीने गुन्हा करण्यासाठी वापरलेला रु.15 लाख किमंतीचा अशोक लेलैंड कंपनीचा ट्रक क्र.GJ 37 T 7514 तसेच 50 लाख रुपये किमतीच्या कापसाच्या 150 गठाणी असा एकूण 65 लाख रु.किमंतीचा मुद्देमाल हस्तगत करून वरील गुन्हा उघडकीस आणला आहे. उपनगर पोलीस ठाणे हद्दीत घुली शिवारात “नारायण कोटेक्स”या कंपनीत तयार होणा-या कापसाच्या गठाणी या शहादा येथील कापसाचे व्यापारी आशिष फुलचंद गोयल यांना दि. 29 डिसेंबर ब2021 रोजी आमरेली,गुजरात येथील “फिदर इंटरनॅशनल” यांना 50 लाख रुपये किंमतीच्या 150 गठाणी पाठवायच्या होत्या, त्यासाठी त्यांनी शहादा येथील त्यांचे ओळखीचे ओमसाई ट्रान्सपोर्टचे मनोज चौधरी यांना ट्रक पाठविण्यास सांगितले.
दि.30 डिसेंबर 2021 रोजी मनोज चौधरी यांनी ट्रक क्रमांक GJ 32 T 9281 हा पाठविला.सदर ट्रकचा ड्रायव्हर हा दि. 30 डिसेंबर 2021 रोजी ट्रकमध्ये 150 गठाणी भरून आमरेली, गुजरात येथील “फिदर इंटरनॅशनल” येथे पोहोचविण्यासाठी कंपनीतुन दिलेल्या बिलपावती व इतर कागदपत्रे घेऊन निघाला,दि.2 जानेवारी 2022 रोजी आशिष गोयल यांनी आमरेली येथील “फिदर इंटरनॅशनल” येथे ट्रक पोहोचला कि नाही याची माहिती घेतली असता सदरचा ट्रक हा तेथे पोहोचला नव्हता.तसेच ट्रकचालकाचा मोबाईल देखील बंद येत होता. मनोज चौधरी यांनी ट्रकच्या मालकाची माहिती काढून त्यांना संपर्क साधला असता त्यांनी त्यांचा कोणताही ट्रक महाराष्ट्रात पाठविला नसल्याचे व ते महराष्ट्रात येत नसल्याचे सांगितले.आशिष गोयल व मनोज चौधरी यांनी ट्रकची शोधाशोध केली. परंतु ट्रकबाबत काहीच माहीती मिळत नसल्याने व ट्रक ड्रायव्हरचा मोबाईल बंद येत होता.
त्यामुळे कोणीतरी ट्रकचा बनावट क्रमांक वापरुन त्यांचा विश्वास संपादन करुन त्यांची फसवणूक केली असल्याचे त्यांचे लक्षात आल्याने त्यांनी उपनगर पोलीस ठाणे येथे दिलेल्या तक्रारीवरून गुरनं 03/2022 भादवि कलम 406 प्रमाणे अज्ञातट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.गुन्ह्याचे गांभिर्य पाहुन नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील,अपर पोलीस अधीक्षक विजय पवार उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांनी उपनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नरेंद्र भदाणे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना तपासाबाबत सविस्तर मार्गदर्शन करुन गुन्हा उघडकीस आणणेकामी सुचना दिल्या.त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा व उपनगर पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार यांची 2 तपास पथके तयार करुन गुजरात राज्यातील तसेच महामार्गावरील टोलनाके,आरटीओ चेकपोस्ट इत्यादी ठिकाणी तपास करीत मोरबी येथे पाठविले. मोरबी येथे ट्रक चालकाने वापरलेल्या सिमकार्डचे आधारे तपास केला असता सदर सिमकार्ड हे कोणीतरी अज्ञात व्यक्तीने ज्या मोबाईल दुकानातून घेतले त्या मुळ मालकाला शोधून काढले.परंतु त्यांना सदरचे सिमकार्ड कोण वापरत आहे याबाबत काही माहीती सांगता येत नव्हती.
त्यामुळे त्या परिसरातील सीसीटीव्ही तसेच गोपनिय बातमीदारामार्फत 2 दिवस वेषांतर करुन तपास केला असता त्या संशयीत आरोपीचेनाव उस्मान मोवर असे समजले.त्याच्याबाबत स्थानिक गुन्हे शाखा व उपनगर पोलिसांनी सखोल माहिती घेतली असता तो अजमेर येथे गेला असल्याचे सांगितले.प्राप्त माहीतीचे आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक अजमेर राजस्थान येथे गेले.तसेच उपनगर पोलिसांचे पथक हे मोरबी,गुजरात येथे स्थानिक तपास करीत होते.स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने अजमेर येथे मिळालेल्या जुजबी माहितीचे आधारे तपास सुरु केला.त्यात त्यांनी 200 लॉजेस 50 पार्किंगच्या जागा तपासुन संशयिताची माहिती मिळविली. तोपर्यंत संशयित आरोपी उस्मान मोवर याने अजमेर सोडल्याचे समजले.अजमेर येथील दर्ग्यातील विधी नंतर लोक तेथुन 50 किमी अंतरावर असलेल्या आसवाडा येथील दर्ग्यालापण जातात अशी माहीती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आसवाडा या गावी पोहोचले.आसवाडा गावातील दर्ग्याच्या परिसरात स्थानिक गुन्हे शाखेचे पथक वेषांतर करून माहिती घेत होते. त्यादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी गुप्त बातमीदारामार्फत आरोपीकडे असलेल्या गाडीचे वर्णन प्राप्त झाले होते.
सदरची माहिती दोन्ही पथकांना दिली. आसवाडा येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने प्राप्त माहितीच्या आधारे संशयित गाडी शोधली असता त्यांना पाकींगमध्ये त्या वर्णनाची गाडी दिसुन आली.त्यागाडीजवळ स्थानिक गुन्हे शाखेचे पथक 4 तास दबा धरुन होते.संशयीत आरोपी इसम हा गाडीजवळ आला असता स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याचेवर हात टाकला. परंतु आरोपी यास चाहुल लागल्यामुळे तो पंळू लागला.त्याचवेळेस स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने अत्यंत चपळाईने हालचाली करुन त्याचा पाठलाग करुन त्यास पकडले. संशयित आरोपी इसमाने त्याचे नाव उस्मान सालेमान मोवर वय 45 रा.वालीया ता. जि.मोरबी,गुजरात असे सांगितले.आरोपीकडे गुन्ह्याबाबत विचारपुस केली असता त्याने सदरचा गुन्हा केल्याचे कबुल केले.त्याने गुन्ह्यातील अपहार केलेल्या कापसाच्या गटाणी या मोरबी येथे ठेवल्याचे सांगितले.तेथे उपनगर पोलीस स्टेशनचे पथक तळ ठोकून होते.त्याना सदरची माहीती दिली असता त्यांनी त्या कापसाच्या गटाणी शोधुन काढल्या.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक हे आरोपीस अजमेर येथुन घेऊन मोरबी येथे पोहोचले. दोन्ही तपास पथकांनी संयुक्त कारवाई करुन आरोपीने गुन्हा करण्यासाठी वापरलेला रु.15 लाख किमंतीचा अशोक लेलैंड कंपनीचाट्रक क्र.GJ 37 T 7514 तसेच 50 लाख रुपये किमतीच्या कापसाच्या 150 गठाणी असा एकूण 65 लाख रु.किमंतीचा मुद्देमाल हस्तगत करून वरील गुन्हा उघडकीस आणला आहे.सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नंदुरबार पी. आर.पाटील, अपर पोलीस अधीक्षक विजय पवार,उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे,यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर,उपनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नरेंद्र भदाने, पोलीस उपनिरीक्षक प्रशांत राठोड,पोलीस हवालदार प्रमोद सोनवणे,कैलास मोरे, पोलीस अमंलदार अभय राजपुत, अभिमन्यु गावीत,शोएब शेख, राकेश चौधरी,जयेश बावीस्कर यांचे पथकाने केली असुन पी.आर. पाटील,पोलीस अधीक्षक नंदुरबार यांनी पथकाचे अभिनंदन केले आहे.