
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा
नवी दिल्ली : या वर्षाच्या अखेरीस गुजरातेत विधानसभा निवडणुका होणार आहेत. आप आणि तृणमूल काँग्रेस हे दोन्ही पक्ष दिल्ली आणि प. बंगालच्या बाहेर विस्तारासाठी प्रयत्नशील आहेत.पंजाबमध्ये आपची वाढती ताकद गुजरातमध्ये भाजपसाठी समस्या निर्माण करणारी ठरणार आहे. पंजाबमधील निवडणुकीत आप आणि काँग्रेस यांच्यातच लढत होणार असल्याचे निवडणूक पूर्व सर्व्हेक्षणातून समोर आले आहे.
याशिवाय अमरिंदर यांचा पंजाब लोक काँग्रेस पक्ष, भाजप, अकाली दल-बसप आघाडी हे पक्षही लढतीत प्रमुख असतील. मात्र, पंजाबमधील आपचे वाढते वजन गुजरातमधील निवडणूक समीकरण बदलू शकते. पंजाबमध्ये आपला मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करताना वेळ लागत आहे. मात्र, या पक्षाला बाहेरचा पक्ष म्हणून बघितले जात नाही. लोक अरविंद केजरीवाल आणि दिल्ली मॉडलला मत देतील.
मुख्यमंत्र्यांचे भाऊ अपक्ष लढणार पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांचे भाऊ डॉ. मनोहर सिंग यांना काँग्रेसने तिकीट न दिल्यामुळे त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार असल्याचे म्हटले. निवडणूक लढवण्याच्या उद्देशानेच मनोहर सिंग यांनी सरकारी नोकरीचा राजीनामा दिला होता. ते वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी होते. त्यांना बस्सी पठाना मतदारसंघातून उमेदवारी हवी होती. पक्षाने विद्यमान आमदार गुरप्रीत सिंग जीपी यांनाच संधी दिली. काँग्रेसने जाहीर केलेल्या ८६ जणांच्या यादीत मनोहर सिंग यांचे नाव नव्हते.