
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा
२५ डिसेंबर २०२१ ची सकाळ…वेळ साधारण दहाची “गोखलेनगर’ येथील जनता वसाहत मध्ये वास्तव्यास असणारे “सागर देवकर’ यांच्या सह अवघ्या कुटुंबियांच्या काळजाला चर्रर असा चटका बसावा अशी घटना घडली त्यांच्या कुटुंबातील”स्वरांश देवकर”या अवघ्या दोन वर्षाच्या चिमुरड्याने घराच्या कठड्यावर अंघोळीसाठी ठेवलेले उतिउष्ण असे पाणी आईच्या नकळत अवधानाने त्याने अंगावर ओढुन घेतले. कोवळ्या शरिरावर प्रचंड उष्ण असलेले पाणी पडल्याने हा चिमुरडा मोठ्या प्रमाणात भाजला गेला….सदर मुलाला प्राथमिक उपचारासाठी खाडे हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले. मात्र परिस्थितीचे गांभीर्य पाहता तेथील वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी उपचारासाठी हडपसर येथील “नोबल हॉस्पिटल’ मध्ये पाठवले….
या ठिकाणी मुलावरती उपचार सुरू आहेत. तो तब्बल ६०% भाजला आहे मुलाची परिस्थिती नाजूक आहे. उपचाराचा खर्च तब्बल १२ लाख रुपये ऐवढा आहे सामान्य कुटुंबातील “सागर देवकर’ हतबल झालेले आहेत…आधीच कोरोनाने कंबरडे मोडलेले असताना अशा परिस्थिती मध्ये एवढी रक्कम कशी जमा करावी हा प्रश्न त्यांच्या समोर उभा आहे. पण समाजातील “दानशुर’,सामाजिक जाणीव असणारे व्यक्तीमत्व,सर्व पक्षीय नेते, सामाजिक संघटना, आपल्या छोट्यास्या मदतीने एका चिमुरड्याचा जिव वाचू शकतो…गरज आहे ती आपल्या मदतीची… माणुसकीचा हात पुढे करत “स्वारांश देवकर’ या छोट्या बालकाच्या प्रकृतीसाठी सढळ हाताने मदत करुयात….
आपली एक छोटीशी मदत एक जीव वाचवु शकते…. १०० ₹ पासून पुढे ही आपण मदत करू शकता .
मदतीसाठी …
सागर देवकर – ९१४५६ ५२६०८
( google pay no )
माहितीसाठी नोबल हॉस्पिटल संपर्क क्रमांक – ०२० ६६२८५०००