
दैनिक चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी
गोविंद पवार
लोहा :- लोहा तालुक्यातील पेनुर येथील सय्यद बाबा याञा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती याञा मोहत्सव कमिटीनी दिली आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही होणारी पेनुर येथील सय्यद बाबा याञा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, तथा जिल्हाधिकारी नांदेड यांच्या आदेशानुसार , व कोरोना नियमांचे पालन करत यावर्षी दिनांक 20 , 21 जानेवारी रोजी होणारी याञा रद्द करण्यात आली असून दि 20 जानेवारी रोजी रात्री सय्यद बाबा यांची संदल मिरवणूक सर्व गावकऱ्यांच्या उपस्थितीत काढण्यात येणार असल्याची माहिती संदल मिरवणुकीचे मानकरी माजी सरपंच रामदास पाटील गवते, लक्ष्मण पाटील गवते, प्राचार्य डॉ अशोक पाटील गवते यांनी दिली आहे. या वर्षी होणारी याञा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली असली तरी सर्व गांवकरी मंडळीनी पुजा नैवेद्य दाखवून साजरी करावी प्रशासनाला साथ देऊया व कोरोनाला हारवुया असा संदेश यावेळी याञा कमिटीनी दिला.