
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी पेठवडज
बाजीराव गायकवाड
नांदेड :- येथील जय भोईराज युवा गर्जना फाउंडेशन महाराष्ट्र राज्य शाखा नांदेड यांच्या वतीने शहीद बालाजी डुबूकवाड यांच्या स्मरणार्थ भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. तरी नांदेड जिल्ह्यातील सर्वांना कळविण्यात येते की, हे रक्तदान शिबीर दिनांक २५/०१/२०२२ रोजी आयोजित करण्यात आले होते, परंतु काही कारणास्तव हा कार्यक्रम दिनांक २६/०१/२०२२ रोजी आयोजित केला आहे. तरी सर्व भोईसमाज व युवा कार्यकर्ते आणि परिसरातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की आपण सर्वांनी कोरोना च्या नियमाचे काटेकोरपणे पालन करून शहीद बालाजी डुबूकवाड यांच्या स्मरणार्थ रक्तदान करून देशसेवेचा लाभ घ्यावा.
रक्तदान शिबीराचे स्थळ :- मुथा चौक हनुमान पेठ वजिराबाद चौरस्ता एस. पी. आॅफिस च्या बाजूला ठेवण्यात आले आहे तरी सर्वांनी दि. २६/०१/२०२२ रोजी सकाळी ११ ते सांयकाळी ५ वाजेपर्यंत रक्तदान शिबीरात भाग घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.