
दैनिक चालु वार्ता
कंधार प्रतिनिधी
माधव गोटमवाड
सकाळी उठल्याबरोबर दररोज कानावर एक शब्द येतो तो म्हणजे अपघात झाला आणि डोक्यात वेगवेगळे चक्र चालू होतात कोणत्या ठिकाणी झाला असेल म्हणून माणूस गांभीर्याने त्या बातमीकडे लक्ष देतो आणि त्याचा चेहरा झर्रकन उतरतो हा तर आपला मित्र होता, नातेवाईक होता ,याची आठवण येते, म्हणून अपघात म्हणजे काय? याविषयी आपण अगोदर माहिती करून घेऊ, एखादे वाहन दुसऱ्या वाहनाला वेगात जाऊन धडकने, पायी चालणाऱ्या व्यक्तीला चिरडून टाकणे, विजेच्या खांबाला जाऊन आदळणे किंवा एखाद्या जनावराला रस्त्यावर धडकने,तसेच झाडाला जाऊन गाडी ठोकने, याला अपघात म्हणतात .
भारतातील सर्व राज्यापेक्षा महाराष्ट्र राज्यात जास्त रस्ते अपघात होतात. याची कारणे काय असतील? नैसर्गिक मृत्यू पेक्षा अपघाती मृत्यू जास्त का होतात? दररोज कुठेतरी एखादा तरी अपघात होतो? असे का घडते? राज्यात अपघाताचे प्रमाण वाढतच आहे, 2021 मध्ये 26 हजार 284 रस्ते अपघात झालेले आहेत, या अपघातात गेल्यावर्षी 14266 प्रवासी जखमी झाले तर 11960 प्रवाशांचा मृत्यू झाला हा आकडा ऐकल्यानंतर काळजाचे थरकापहोतो, यासाठी काहीतरी ठोस उपाय करावेत आणि अपघाताचे प्रमाण कसे कमी करता येईल यावर साधकबाधक चर्चा होणे हीच काळाची गरज आहे.
अपघात होणार नाहीत याविषयी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठीच सविस्तर माहिती आपण या लेखात करून घेणार आहोत त्यासाठीच हा लेखन प्रपंच मनुष्य जन्म हा चौर्यांशी लक्ष योनी तून झाला आहे असे म्हणतात. मग हा मनुष्य समाधानाचे जीवन का जगत नाही. वाहतूक नियमांचे पालन तो का करीत नाही. नियम हे आपल्या सुरक्षेसाठी आहेत अशी भावना शालेय स्तरापासून प्रत्येकात रुजलेली आपणास दिसते .म्हणून समजून घेऊन सावध राहून आपण आपले वाहन चालवावे, मनुष्य हा सुशिक्षित असून हुशार व बुद्धिमान आहे, तो चांगल्या पदावर नोकरी करतो, काही जण व्यापार करतात,पण गाडी चालवते वेळी ते एखाद्या वेड्यासारखा का वागतात, याची जाणीव त्यांना करून देणे आज काळाची गरज आहे. वाहतुकीचे नियम असताना तो का पाळत नाही.
आपल्याला किती कि .मी दूर जायचे आहे हे त्यांना माहिती असूनही तो वेळेवर घरून का निघत नाहीत.त्यामुळे वेळ कमी पडतो आणि तो गाडीचा वेग वाढवतो.आपण वेळेवर ऑफिसला किंवा एखाद्या महत्त्वाच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचलो नाही तर आपला अपमान होईल.ऑफिस मधून लेखी नोटीस निघेल या विचारचक्रात तो गाडी सुसाट चालवतो आणि नेमके कुठे तरी विचार तंद्रीतून अपघात होतो. रस्ता म्हटला की खड्डे आलेच, तेव्हा गाडीचा वेग कमी करून चालविने गरजेचे आहे. कंत्राटदारानी रस्ते करताना काळजीपूर्वक दूरदृष्टी ठेवून तयार करायला हवेत, रस्ते हे देशाच्या रक्तवाहिन्या आहेत,त्यामुळे त्या चांगल्या पाहिजेत, हे वेगळे सांगण्याची गरज नाही.
गाडीचा वेग वाढविल्यामुळे खड्डयांचा अंदाज येत नाही. गाडीला ब्रेक लावण्याच्या नादात आपली गाडी दुसऱ्या गाडीवर आदळते किंवा खड्डयात आपटते एकाकी ब्रेक लावल्यामुळे मागील गाडी आपल्या गाडीवर येऊन धडकते. सध्या लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे लोकांची रस्त्यावर खूप वर्दळ वाढली आहे. दररोज नवनवीन गाड्या बाजारात विक्रीसाठी येतात .अनेक महाविद्यालयीन युवक -युवती कर्मचारी गाड्या खरेदी करताना दिसतात,अनेक जणांकडे लायसन्स नसतात. तरीही गाड्या सुसाट वेगाने धावतात. एका मोटरसायकलवर तीन -तीन मित्र बसून मोबाईलवर गप्पा गोष्टी करताना आपण पाहतो,मध्येच खड्डा आला की गाडी आदळते किंवा खाली पडतात.काही पालक लहान मुलांमुलीच्या हातात मोटरसायकल देतात त्यांचे पाय जमिनीवर टेकत नसतात. त्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता असते आणि हाकनाक मरण पावतात.
वाहतुकीचे नियम व कायदा अतिशय चांगला आहे पण त्याची अंमलबजावणी म्हणावी तशी होताना दिसत नाही.कडक नियम लावून दंड करावा लागतो. तो परवाना काही वर्षासाठी रद्द केल्यास अनेक जणांचे डोके ठिकाणावर येईल,गाडी कमी वेगात चालविले जाईल .तीन व्यक्ती एका मोटर सायकल वर बसणार नाहीत,याची दक्षता घ्यावी लांब पल्ल्याच्या गाड्या किंवा मोठे अवजड ट्रक माल वाहतूक करणाऱ्या गाड्या यांच्या चालकाला हवी तशी विश्रांती मिळत नाही.विश्रांती मिळत नसल्यामुळे डोळ्यात झोप असते. निसर्गाने १२ तासांचा दिवस व बारा तासांची रात्र दिली आहे, याचाही अनेक जणांना विसर पडला आहे. रात्रीला झोप झाली नाही तर गाडी चालविते वेळी डुलकी लागते त्यामुळे भीषण अपघात होतात या सर्व गोष्टीचा बारकाईने विचार प्रत्येकांनी करावा. कधीकधी विचित्र अपघात घडतात,शहरांमध्ये जास्तीत जास्त गर्दी असते. गतिरोधक ही असतात सिग्नल्स पडेपर्यंत काही जणांना थांबावे वाटत नाही अशावेळी अपघात होतात .
ग्रामीण भागात वाहतूक करणा-या प्रवाशी गाड्या वाजवीपेक्षा जास्त व्यक्ती गाडीमध्ये बसवून नेतात, रस्त्यावर चढ-उतार आल्यास चालकाचा गाडीवरील ताबा सुटतो व अपघात होऊन अनेक लोक प्राणास मुकतात .मद्य पिऊन गाडी चालविणाऱ्याची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी वाहतूकीच्या नियमाविषयी जागरुक असावे. प्रशिक्षित व्यक्ती असल्या शिवाय त्यांनी गाडी चालू नये रस्ते अपघाता बरोबर लोहमार्गावरही अपघात होतात. रेल्वेचे आजपर्यंत अनेक लहान-मोठे अपघात झाले आहेत,एकाच रूळावर दोन रेल्वे येतात ही मानवी चूक आहे. किंवा जास्त वेगाने रेल्वे रूळावरून धावतात,त्यामुळे रेल्वेचे डबे घसरतात आणि हजारो निष्पाप लोकांचे जीव जातात. रेल्वे येते वेळेस किंवा जाते वेळेस रेल्वेचे फाटक बंद असूनही अनेक लोक रेल्वे रूळावरून घाईघाईने ये-जा करतात त्यामुळे अपघात होतात. म्हणून सुज्ञ व सुजाण नागरिकांनी फाटकाजवळून रेल्वे जाईपर्यंत जागेवरच थांबावे व आपला जीव वाचवावा, घाई करू नये. दीर्घायुष्य जीवन जगण्यासाठी थांबने आवश्यक आहे.
अपघात झाल्यावर चौकशी सुरू होते,कारणे शोधली जातात, वाद कोर्टापर्यत जातात, अनेक वर्ष केसेस चालतात पण मनुष्य कायमस्वरूपी जातो, याचे भान सर्वांनी ठेवावे, ज्याप्रमाणे रस्त्यावर अपघात होतात, त्याप्रमाणे विमानाचे सुद्धा अपघात होताना दिसतात. विमानाचे उड्डाण करतेवेळी हवामानाचा अंदाज घेऊनच उड्डाण करावे तसे न करता उड्डाण केल्यास किवा हवामानात एकाकी बदल झाल्यास अपघात होण्याची दाट चिन्हे दिसतात. काही वेळेस विमान भरकटतात, दिशा स्पष्ट दिसत नाहीत. विमानतळावर विमान उतरण्याच्या अगोदर अपघात होतात, हेलिकॉप्टर सुद्धा अनेक वेळा खाली पडून अनेक लोकांचे प्राण गेले आहेत, यासाठी एवढेच सांगणे आहे की वेळेला महत्व द्या.लवकर निघाले तर लवकर पोहोचणार आहोत, याची जाणीव ठेवा.
“नको पुढे करू जाण्याची घाई- हा जन्म पुन्हा येणार नाही,” वरील सर्व घटना टाळण्यासाठी जनता आणि प्रशासन तेवढेच महत्त्वाचे आहेत.वाहनचालकांमध्ये जागरुकता वाढविणे .गाडीमध्ये माल कमी भरणे. वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे,सध्या ऊस तोडणी चालू आहे,अनेक मजूर शेतात काम करीत आहेत, ट्रॅक्टर मध्ये ऊस भरून कारखाण्याकडे घेऊन जाताना दोन-दोन ट्राॅली लावून नेतात,प्रत्येक ट्रॅक्टरला पाठीमागे रेडियम असावा, बैलगाडीला सुध्दा रेडियम बसविण्यात यावे,त्यामुळे वळणाच्या ठिकाणी अपघात होणार नाहीत, त्यामुळे अनेक ऊसतोड कामगार जखमी होणार नाहीत, आणि अनेक कुंटुबे उध्वस्त ही होणार नाहीत, दोन ते तीन मिनिटांची घाई करून अनेक जण जीवनातून संपले आहेत, म्हणूनच म्हणतो गाडी चालवताना मोबाईल वर जास्त बोलू नये .
हे सर्व कारणे पाळले तर अपघाताचे प्रमाण नक्कीच कमी होईल. आज भारतात प्रति तासाला ५३ रस्ते अपघात होतात ,आणि चार मिनिटाला एका व्यक्तीचा मृत्यू होतो. अपघात करणाऱ्या व्यक्तीमध्ये 18 ते 35 वयोगटातीलच तरूणाचे प्रमाण 70% पेक्षा जास्त आहे. वाहनचालकांची कमजोर नजर, श्रवणशक्ती, निर्णय क्षमता कमी असणे ही अपघाताची कारणे आहेत, एखादे वाहन घाटातून, वळणाच्या ठिकाणी, शहरांमधून सावकाश चालविल्यास अपघात कमी होतात. मोटर सायकल चालविणाऱ्यांनी नेहमी हेल्मेटचा वापर करावा, चार चाकी चालविणा-यांनी नेहमी सीट बेल्ट वापरावा. गाडीची नेहमी काळजी घ्यावी.गाडी चालविताना दोन वाहनामध्ये सुरक्षित अंतर ठेवावे, गाडीला दोन्ही बाजूंना आरसा असावा, जीर्ण झालेल्या गाड्या रस्त्यावर आणू नये.यामुळे ही अपघात कमी होतात.
आपल्याकडे अपघात झाल्यास अनेक लोक मदत करण्यासाठी येत नाहीत. गाडीमध्ये काही महत्त्वाचे साहित्य असल्यास पळून नेतात, ही मानसिकता अगोदर कमी केली पाहिजे,अपघात समयी लोकांना मदत करा,तसे न करता गैरसमज करून घेऊन निघून जाऊ नका,कारण पोलिसांना अनेक वेळेस जबाब द्यावा लागतो.म्हणून सर्वसामान्य व्यक्ती अपघात समयी जवळ असतानाही दूर निघून जातात. त्यामुळे लोकांचे प्राण जातात, अनेक महिला विधवा होतात. पत्नी मरण पावल्यानंतर पती विधुर होतो, त्यांच्या स्वप्ननांचा चुराडा होतो, पती दोन -तीन मुले पदरात टाकून कायमस्वरूपी निघून जातो, आणि त्याचा आयुष्यभर त्रास पत्नीला सहन करावा लागतो,
एखाद्या घरातील एकुलता एक मुलगा सुध्दा अपघातात मृत्यू पावतो आणि घरातील सर्वच लोकांना जीवनभर रडवित ठेवतो, म्हणून हा लेख लिहिण्याचा एवढेच कारण की चालकाने आपली गाडी सुरक्षित आहे की नाही हे पाहून वेग कमी करून चालवावी,मद्यपान करून गाडी चालवू नये. मोबाईल वर बोलू नये, डोळ्याची नजर कमी झाल्यास लवकरात लवकर निदान करून घ्यावे. आणि प्रवाश्यांना चांगली सेवा द्यावी, ज्या घरातील व्यक्तीचा अपघात होतो, त्याच घरातील लोकांना दु:ख काय असते, याची कल्पना येते, इतरांना काही झाल्यावरच कळते, त्यासाठीच रस्ते अपघात थांबविणे अत्यंत आवश्यक आहे, नसता “ये भाई जरा देख के चलो …… आगे भी नहीं पीछे भी …..
साहित्यिक
प्रा.बरसमवाड विठ्ठल गणपत
खैरकावाडी, ता,मुखेड जि,नांदेड