
दैनिक चालु वर्ता
जव्हार प्रतिनिधी
दिपक काकरा
जव्हार :- आरोग्य हीच खरी संपत्ती आहे हे डोळ्यासमोर ठेवून युवा मित्र व बजाज या सामाजिक संस्थांनी एकत्रित येऊन विशेष करून ग्रामीण महिलांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते.या आरोग्य शिबिरात नामवंत डॉ.भरत पाटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली न्याहाळे,रायतळे,बोरहट्टी,आपटाळे व केळीचापाडा येथिल गरजू रुग्णांसाठी नंदनमाळ व पोंढीचापाडा येथे रुग्णांची वजन-उंची,शारीरिक तापमान, ऑक्सिजन लेवल,रक्तदाब, शुगर तपासणी अश्या तपासण्या करण्यात आल्या.संस्थेच्या कार्यकारी संचालिका मनिषताई पोटे यांच्या पुढाकाराने घेण्यात आलेल्या या शिबिरात गरोदर महिला,स्तनदा माता,कुपोषित बालके यांची तपासणी करण्यात आली.जवळपास ३०० रुग्णांची तपासणी करून उपचार करण्यात आले.
ग्रामीण भागातील जनतेचे आरोग्याकडे होणारे दुर्लक्ष या मध्ये महिलांचे हिमोग्लोबिन,कॅल्शियम,लोह यांची शरीरात असणारी कमतरता,आरोग्य सुविधांचा अभाव तसेच ग्रामीण भागातील महिलांची आरोग्य विषयी असलेली मानसिकता बदलण्यासाठी या मुख्य उद्दिष्टाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.दरम्यान शिबिराच्या ठिकाणी ने-आण करण्यासाठी संस्थेकडून वाहनांची उपलब्धता करून देण्यात आलेली होती.या शिबिराच्या आयोजनात संस्थेच्या प्रकल्प व्यवस्थापिका सोनाली गुजराथी,समन्वयक कृष्णा बाजारे यांनी विशेष मेहनत घेतली तसेच विभाग समन्वयक योगेश अभंग,किरण गोरे, आरोग्य सेविका लक्ष्मी पालवे,लता कोरडा,वैशाली पवार,माधुरी मौळे व वैद्यकीय अधिकारी,अंगणवाडी सेविका,आशा वर्कर यांची उपस्थिती होती.