
दैनिक चालु वार्ता
भंडारा प्रतिनिधी
राजेश गेडाम
भंडारा :- पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी यांच्याबद्दल अपशब्द काढून त्यांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात भंडारा पोलीस ठाण्यात खासदार सुनील मेंढे व अनेक भाजप कार्यकर्त्यांसोबत तक्रार दाखल केली. लोकांशी संवाद साधताना नाना पटोले यांनी “मी मोदींना मारू शकतो आणि शिव्या देऊ शकतो” असे वक्तव्य केले. देशाच्या पंतप्रधानाच्या बाबतीत अपमानास्पद आणि निंदनीय वक्तव्य करून सर्वसामान्य नागरिक आणि भाजप कार्यकर्त्यांचा रोष ओढवून घेणार्या पटोले यांच्या विरोधात भंडारा पोलीस स्टेशन मध्ये जात तक्रार दिली.
पटोले यांचे वक्तव्य अत्यंत निर्लज्जपणाचे असून त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी, मा.नरेंद्रजी मोदी यांच्या वाईटावर काँग्रेस टपलेले आहे पंजाब मधील घटना अजून ताजी असताना काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी मोदींजी विषयी असे वक्तव्य करून काँग्रेसच्या नेत्यांची लायकी काय हे दाखवून दिले. नाना पटोले यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करावी अशी मागणी खासदार सुनील मेंढे व भाजप कार्यकर्ते यांनी केली असे न झाल्यास आम्ही रस्त्यावर उतरू असा इशाराही दिला.
यावेळी खासदार सुनील मेंढे, मा.डॉ.उल्हासजी फडके, मा.मुकेशजी थानथराटे, मा.रुबीजी चड्डा, मा.चौबेजी, मा.आशु गोंडाने, मा.मयूरजी बिसेन, मा.सूर्यकांतजी इलमे, मा.सौ.वनिताताई कुथे, मा.सौ.गिताताई सीडाम, मा.प्रीतीताई गोसेवाडे, मा.कैलासजी तांडेकर, मा.मंगेशजी वंजारी, मा.मिलींदजी मदनकर, मा.कृष्णकुमार बत्रा, मा.विकासजी मदनकर, मा.अजीजजी शेख, मा.नरेशजी बोन्द्रे, मा.शैलेशजी मेश्राम, मा.रोशन काटेखाये, मा.मनोज बोरकर, मा.भुपेश तलमले, मा.कृष्णा उपरिकर, मा.प्रशांत निंबोळकर, मा.सचिन कुंभलकर, मा.शिव आजबले, मा.अमित बिसने, मा.सोनू कळंबे, मा.अजय कावळे, मा.शालीक अहिरकर, मा.आकाश फाले, मा.शुभम चौधरी, मा.प्रकाशजी पांडे आदी उपस्थित होते..