
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी अरुण भोई
याबाबत आमच्या प्रतिनिधीशी बोलताना शेतकरी गौतम कांबळे म्हणाले की पोपळज येथील रेल्वे गेट जवळील डीपीची वायर तुटलेली असून तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्याची वारंवार मागणी करूनही पोफळज येथील वायरमेन त्याकडे दुर्लक्ष करत आहे व शेतकऱ्यांशी आरेकाऱ्याची भाषा बोलत आहे .जेऊर येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली असता त्यांनी कोणतीही दखल घेतली नाही .पोफळज येथील वायरमेन व वरिष्ठ अधिकाऱ्यांची तक्रार ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्याकडे करण्यात आली आहे .
राजेंद्र सुनिल सुरवसे वायरमन पोफळज ता. करमाळा जि सोलापूर यांस निलंबित करण्याची मागणी गौतम कांबळे राज्याध्यक्ष
महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघ यांनी ऊर्जा मंत्री नितीन राऊत साहेब यांच्याकडे केली आहे.राजेंद्र सुनील सुरवसे वायरमन पोपळज उपकेंद्र शेटफळ तालुका करमाळा जिल्हा सोलापूर उपविभागीय कार्यालय जेऊर तालुका करमाळा विभागीय कार्यालय बार्शी जिल्हा सोलापूर हा या ठिकाणी गेली अनेक वर्ष कार्यरत आहे. पोपळज गावच्या हद्दीत रेल्वे गेटजवळ एमएससीबीचा डीपी आहे.
या वीज वितरण कंपनीच्या डीपीवरून अनेक मागासवर्गीय व बौद्ध शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना वीज पुरवठा केला जातो. या वीज पुरवठा करणाऱ्या डीपीवर काही तांत्रिक बिघाड झाल्यास पोपळज याठिकाणी नेमणुकीस असलेला वायरमेन राजेंद्र सुनील सुरवसे हा तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यास जाणीवपूर्वक उशीर करतो व मागासवर्गीय व बौद्ध शेतकऱ्यांची पिके वीज पुरवठ्याच्या अभावी कशी जळतील याचीच सदैव वाट पाहतो की काय ? असे निदर्शनास येते आहे. तांत्रिक बिघाड जाणीवपूर्वक लवकर दुरुस्त करत नाही. यामुळे बौध्द शेतकऱ्यांनाआर्थिक व मानसिक पिळवणूक करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न वारंवार होतो आहे. अशा जातीवादी वायरमन राजेंद्र सुनील सुरवसे याला ताबडतोब निलंबित करावे असे मत स्थानिक शेतकऱ्यांकडून होत आहे