
दैनिक चालु वार्ता
परतूर प्रतिनिधी
नामदेव तौर
परतूर :- माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेली शिवसेना प्रिमिअर लीग क्रिकेट स्पर्धा उत्साहात झाली. स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी खेळविण्यात आला. त्यानंतर विजेता व उपविजेता संघाला पारितोषिक वितरण करण्यात आले. या वेळी पालिकेचे गट नेते मोहन अग्रवाल युवा नेते महेश नळगे, तालुका अध्यक्ष अशोक आघाव, आबासाहेब कदम, मधुकर पाईकराव, अहमद चाऊस, सरफराज कायमखणी, नगरसेवक शरीफ कुरेशी, नासेर चाऊस, डॉ. वाजेद खान यांच्यासह खेळाडू व प्रेक्षकांची उपस्थिती होती.
या वेळी अंतिम सामना बुधभूषण विरुद्ध नितीन इलेव्हन या दोन संघात खेळवण्यात आला. विजेत्या बुधभूषण या संघाला प्रथम पारितोषिक ३५ हजार ५५५ रुपये महेश नळगे यांच्या वतीने देण्यात आले. द्वितीय पारितोषिक २५ हजार ५५५ नगरसेवक शरीफ कुरेशी यांच्या वतीने नितीन इलेव्हन संघाला देण्यात आले.
फोटो – परतूर : शिवसेना प्रिमिअर लीगचे प्रथम पारितोषिक विजेता संघाला देताना गटनेते मोहन अग्रवाल व युवा नेते महेश नळगे आदी.