
दैनिक चालु वार्ता
परतूर प्रतिनिधी
नामदेव तौर
दैठना बु. येथील सरपंच तथा भाजपा युवा मोर्च्याचे तालुकाध्यक्ष शत्रुघ्न कणसे यांनी आपल्या मुलांचा वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा करून वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना कोविडपासून बचाव करण्यासाठी सुरक्षा साहित्य व गरजूंना १०० ब्लॅकेट वाटप केले आहेत. जयश शत्रुघ्न कणसे यांच्या चौथ्या वाढदिवसानिमित्त दैठना बू व हरेराम नगर येथील प्रशाला येथे कोविडच्या प्रादुर्भावमुळे शाळा बंद आहेत. विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. त्याचीच खबरदारी घेऊन शाळा सुरू करण्यासाठी पहिले पाऊल म्हणून वाढदिवसाचे औचित्य साधून मास्क सॅनिटायझर व खाऊचे वाटप विद्यार्थ्यांना केले.
तसेच येथील गरजवंताना थंडीपासून संरक्षण व्हावे यासाठी शंभर ब्लॅकेट वाटप करण्यात आले. शत्रुघ्न कणसे म्हणाले की, विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. शासनाने कोविडचे नियम पाळून शाळा सुरू कराव्यात शालेय विद्यार्थ्यांना कोविड पासून बचाव करण्यासाठी लागणारे मास्क, सॅनिटायझर यासह सुरक्षा साहित्य ग्राम पंचायतच्या माध्यमातून पुरविल्या जाईल. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही.
यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर सोळंके, उपाध्यक्ष सुशील कणसे, मुख्याध्यापक एम. पवार, शिक्षिका श्रीमती अंभोरे, उद्धव कणसे, भरत कणसे, ग्रा.पं सदस्य किसन मखमले, ग्रा.प सदस्य काळूजी भदर्गे, सुधाकर कणसे, विद्यार्थी पालक व गावकरी मोठ्या संखेने उपस्थित होते.