
दैनिक चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी
गोविंद पवार
शेतकरी सुखी , तर जग सुखी शेतकऱ्यांना वर्षभरात अनेक कृषी शिबीरांचे करणारे कृषीरत्न – रत्नाकर ढगे
लोहा :- आत्मा अंतर्गत कृषी विभागाच्या फर्दड मुक्त कापूस अभियानांतर्गत रत्नाकर पाटील ढगे (सायाळकर)यांच्या पुढाकाराने सायाळ ता. लोहा येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी शेंद्रिय बोंड अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आत्मा अंतर्गत कृषी विभागाचे अधिकारी मन्मथ गवळी, सोहेल शेख यांनी गावकऱ्यांना मार्गदर्शन केले. शेतकर्यांच्या वतीने सायाळचे युवा प्रगतीशील शेतकरी रत्नाकर पाटील ढगे व पेनुर चे युवा शेतकरी ज्ञानेश्वर गवते यांनी शेतकर्यांना मार्गदर्शन करताना कापुस फर्दडीमुळे होणाऱ्या नुकसानीची माहिती दिली.
त्यामध्ये शेंद्रिय बोंड अळीचे जीवनचक्र तोडण्यासाठी कापसाची लागवड ही सात जुन च्या नंतर करायला हवी.त्यासोबतच कृषी विभागाच्या एक गाव एक वान अभियानांतर्गत 160 ते 170 दिवसात येणाऱ्या बी.टी.वाणांची लागवड केल्यास बोंड अळीचे जीवनचक्र तोडण्यासाठी मदत होते. तसेच खत व्यवस्थापन करताना नत्रयुक्त खतांचा वापर जास्त केल्यास बोंड अळीचे जीवनचक्र पुर्ण होण्यासाठी मदत होते. म्हणून माती परीक्षण करुनच खतांची योग्य मात्रा मात्रा द्यायला हवी.जानेवारी नंतर फर्दड राखल्याने शेतात फ्युजरियम, मुळ सड यांसारख्या अनेक बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव येणाऱ्या पुढच्या पिकात होतो. त्यामुळे पुढच्या पिकात बुरशीजन्य रोगामुळे उत्पादनात घट येते.
आज घडीला कापुस भाव वाढीमुळे अनेक शेतकरी फर्दड राखण्यास प्राधान्य देत आहेत.परंतु त्यामुळे बी.टी.जणुंका विरूद्ध प्रतिकारशक्ती वाढुन बोंड अळीचे प्रमाण वाढण्यास मदत होते.कापुस फर्दड घेण्याऐवजी पर्यायी उन्हाळी मुग किंवा तिळाची लागवड करुन हिरवळीचे खत म्हणून त्याचा फायदा शेतीला होईल.अशा अनेक समस्या वर यावेळी सायाळचे युवा प्रगतीशील शेतकरी रत्नाकर पाटील यांनी आपले मत मांडले. यावेळी गावातील अनेक युवा शेतकरी राजु पाटील, गंगाधर पवार, गोविंद पवार, भानुदास ढगे,राघोजी ढगे, मारोती पवार,सय्यद शेख,आकरम शेख या व इतर शेतकर्यांनी शेतीविषयक समस्या जाणून घेतल्या.