
दैनिक चालु वार्ता
पालघर प्रतिनिधी
अनंता टोपले
-डोंगर दऱ्यांची वाट तुडवित शोधले पाण्याचे स्ञोत
-स्थानिक आमदार ,लोकप्रतिनिधींच्या काळजाला पाझर फुटणार कधी..? —आदिवासी महिलांचा सवाल.
जव्हार :- जव्हार पिंपळशेत खरोंडा ग्रामपंचायतीत असलेल्या हुंबरण गावातील पाणी टंचाईचा प्रश्न प्रसार माध्यमांनी उजेडात आणल्यामुळे शासकिय अधिकाऱ्यांची चांगलीच झोप उडाली आहे.जव्हार तालुक्यात जल जीवन योजना अद्यापही राबविली गेली नसल्याचे वास्तव अखेर समोर आले आहे.सामाजिक कार्यकर्ते मनोज कामडी यांच्या प्रयत्नांनी जव्हार,नाशिक जल परिषदेच्या मिञ परिवाराने रविवारी हुंबरण गावाला भेट दिली.
गेल्या ७५ वर्षापासून स्वातंत्र्यानंतर हि हुंबरण गाव शासनाच्या पायाभूत सुविधांपासुन दुर्लक्षित राहिल्याचे विदारक चिञ पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यात पाहायला मिळत आहे. हुंबरण च्या आदिवासी महिला पाण्यासाठी आज तळमळताना दिसतात. परंतु येथील लोकप्रतिनिधींना,आमदारांना पाझर फुटत नाही. आजही आमदारांच्या भेटीसाठी हुंबरणचे आदिवासी बांधव आतुरलेले आहेत.मात्र आमदारांच्या दौऱ्याची त्यांना प्रतिक्षाच आहे. आज ही ह्या गावातील महिलांपर्यंत प्रधानमंञी जल जीवन मिशन पाणीपुरवठा योजना पोहचलेली नाही.त्यामुळे तेथील आदिवासी भगिनींची पाण्यासाठी तळमळ सुरुच आहे.परंतु ह्या भागातील शासकिय यंञणेला जाग आलेली नसल्याने लोकप्रतिनिधींचे अपयश आहे.
स्थानिक आमदार,लोकप्रतिनिधी यांना आदिवासी बांधवांच्या प्रश्नांची फिकिर आहे कि,नाही? असा सवाल आदिवासी बाधंव करत आहेत. हुंबरण गावाच्या पाणी प्रश्नाची दखल घेत जल परिषदेच्या कार्यकर्त्यांनी डोंगर दऱ्या तुडवित गावाची पाहणी केली.गावातील आदिवासी बांधवाशी सकारात्मक चर्चा करुन बैठक घेतली. त्यात गावातील उपलब्ध पाण्याचा स्ञोत,पाण्याचा साठा, गावकीने श्रमदानातुन बांधलेल्या विहिरी,पाण्याचा उगम,झरे ह्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष भेटी दिल्या.त्या ठिकाणी शासनांच्या प्रयत्नांनी काही पाणीपुरवठ्याच्या योजना गावासाठी कायमस्वरुपी राबविता येतील का?.ह्यासाठी जल परीषद मित्र परिवाराकडून विशेष प्रयत्न केले जाणार आहेत.
याप्रसंगी भेटी दरम्यान जल परिषदेचे मार्गदर्शक देविदास कामडी,गीतेश्वर खोटरे व रायझिंग विथ स्माईल फाऊंडेशन संस्थेचे स्वीकार पाटील, पलाश पाटील, उमेश पाटील,पिंपळशेत खरोंडा ग्रामपंचायत सदस्य गणपत भेसकर ,पञकार भरत गवारी,प्रमोद मौळे व आदी ग्रामस्थ उपस्थित होते. “हुंबरण गावातील महिलांचा पाणी प्रश्न कायमस्वरुपी सोडविण्यासाठी गावात जल जीवन मिशन योजना जव्हार पंचायत समितीकडून अंमलात आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे”.
—-गणपत भेसकर,पिंपळशेत खरोंडा ग्रामपंचायत सदस्य. माडविहरा.