
दैनिक चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी
गोविंद पवार
कंधार :- कंधार तालुक्यातील सिंगल फेस किटकॅट आणि किटकॅट केबल यांची बहुमत आशा गावात जास्त प्रमाणात कमतरता असल्यामुळे कंधार तालुक्यातील जनतेला लाईट बंद च्या समस्येला सामोरे जावे लागत आहे.सध्या शेतकऱ्यांनचे रबी हंगामी चालू आहे.त्यामुळे शेतकरी रात्री बेरात्री शेतीत भिजवण करत आसतो.रात्रीच्या वेळेला 3फेज डिपीवरचा फ्युज उडला आणि तो फ्युज त्या रात्री च्या वेळी टाकणे म्हणजे मरणाला आमंत्रण देणे आहे.
कारण त्या डिपीवर किटकॅट चे टुकडे पडलेले असतात आणि केबल 10 ठिकाणी कट झालेले असते.या संबधात माजी सैनिक संघटनेच्या वतीने कंधार तालुक्यातील महावितरण अधिकाऱ्यांची वारोवार भेट घेऊन विनंती करण्यात आली पण त्यांचे असे म्हणणे येत होते की वरील साहित्य आम्हाला नांदेड वरूनच प्राप्त होत नाहीत.आम्हाला वरुन आले तरच आम्ही देऊ. करिता माजी सैनिक संघटना यांच्या वतीने आज नांदेड कार्यकारी अभियंता ची भेट घेऊन निवेदन देऊन विनंती करण्यात आली की वरील सर्व साहित्याचा पुरवठा 24 जानेवारी 2022 पर्यंत करण्यात यावा.
अन्यथा जनतेच्या वतीने माजी सैनिक संघटना 25 जानेवारी 2022 ला आपल्या कार्यालयाच्या समोर साखळी उपोषणास बसेल याला सर्वस्वी जबाबदार महावितरण प्रशासन राहिल असा सज्जड इशारा माजी सैनिक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष बालाजी चुकलवाड यांनी आपल्या निवेदनाद्वारे दिला आहे.