
दैनिक चालू वार्ता
नांदुरा तालुका प्रतिनिधी
किशोर वाकोडे
दि.18 डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह पंचायत समिती मोताळा येथे दर्शनी भागाला असून या ठिकाणी कार्यशाळा, चर्चा , भाषणे , सेमीनार आणि सांस्कृतिक, सामाजिक ,शैक्षणिक धार्मिक, जागरूकता पर कार्यक्रम घेण्यात येतात. ज्यांनी सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभारली, तसेच महिलांच्या आणि कामगारांच्या हक्काचे समर्थन केले अशा महापुरुषांच्या नावाने मोताळा येथे सभागृह आहे.परंतु या सभागृहाचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर असे नामकरण झाले तेव्हापासून आज पर्यंत लोकप्रतिनिधी व प्रशासनाने दुर्लक्षित ठेवलेले आहे.
प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्या दुर्लक्षित धोरणामुळे या सभागृहाची दुरावस्था झालेली आहे. ही बाब लक्षात घेत वंचित बहुजन आघाडी मोताळा यांच्या वतीने आद. प्रशांत भाऊ वाघोदे वंचित बहुजन आघाडी जिल्हा नेते यांच्या नेतृत्वाखाली व मोताळा तालुका अध्यक्ष युवराज भिडे, तालुका उपाध्यक्ष समाधान डोंगरे, तथा तालुका कार्यकारणी,सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत मा. गटविकास अधिकारी, व मा. सभापती मोताळा यांना निवेदन देण्यात आले.
सदर देशासाठी शहीद झालेल्या जवानांच्या प्रतिमा सुद्धा लावलेल्या असून त्या प्रतिमांचा अवमान झाल्याचे लक्षात येतात आणि तुटलेल्या अवस्थेत फर्निचर पाहता आंदोलनाचा पवित्रा घेण्यात आला.दहा दिवसात जर सभागृहाचे सौंदर्यकरनाचे काम झाले नाही तर वंचित बहुजन आघाडी वतीने सदनशील मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.