
दैनिक चालु वार्ता
औरंगाबाद जिल्हा प्रतिनिधी
अनिकेत संजय पुंङ
दिल्ली :- २६ जानेवारी रोजी राजपथावर होणाऱ्या परेडमध्ये भारतीय सैन्य आणि विविध राज्यातील संस्कृती , कला , चित्रकला , शिल्पकला , संगीत , वास्तुकला , नृत्यदिग्दर्शन यावर आधारित चित्ररथ केले जातात . परंतू या वर्षी भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण झाली असल्याने “ आझादी का अमृत महोत्सव ” या थीमवर चित्ररथांचे सादरीकरण होणार आहे . यामध्ये विविध राज्य आणि केंद्र शासित प्रदेश मिळून २१ चित्ररथांचा सामवेश आहे .
आता या चित्ररथांवरून केंद्र सरकार आणि राज्य सरकार समोरासमोर आल्याच पाहायला मिळत आहे . भाजप शाषित प्रदेशांच्या चित्ररथाला परवानगी मिळाल्याने परत एकदा भाजप विरूध्द संघर्षाला तोंड फुटले आहे. यातच मुख्यता महाराष्ट्र , तामिळनाडू , पश्चिम बंगाल , बिहार आणि केरळ या राज्यांना चित्ररथासाठी संरक्षण मंत्रालयाकडून परवानगी नाकारली गेली .
सरकारने परेडसाठी निवडलेली अंतिम चित्ररथ यादी अद्याप जाहीर करणे बाकी असताना , सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार , परेडमध्ये २१ चित्ररथ असतील . ज्यामध्ये १२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश आणि केंद्र सरकारच्या अंतर्गत नऊ विभाग किंवा स्वतंत्र संस्थांची कपात केली आहे .
चित्ररथ ठरवण्याची प्रक्रिया कधी सुरू होते आणि कोण सहभागी होऊ शकते ?
दरवर्षी सप्टेंबरच्या सुमारास संरक्षण मंत्रालय , ज्यांच्यावर प्रजासत्ताक दिनाच्या परेड सोहळ्यासाठी जबाबदारी असते . तसेच सर्व राज्य , केंद्रशासित प्रदेश , केंद्र सरकारचे विभाग आणि काही संवैधानिक अधिकार्यांना या परेडमध्ये सहभागी होण्यासाठी चित्ररथाद्वारे आमंत्रित केले जाते. संरक्षण मंत्रालयाने ८० केंद्रीय मंत्रालये आणि विभाग , ३६ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना त्यांच्या सचिवांमार्फत , निवडणूक आयोग , नीती आयोग यांना १६ सप्टेंबर रोजी पत्र लिहून त्यांना सहभागी होण्याचं आमंत्रण दिले होतं . पत्रामध्ये प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सहभागासाठी चित्ररथाचा प्रस्ताव आमंत्रित करण्याची प्रक्रियाबाबत भाष्य केले होतं . त्यानंतर २७ सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करायचा होता तसेच ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात प्रस्तावांची निवड प्रक्रिया सुरू करण्यात आली होती .
चित्ररथ कसे निवडले जातात ?
ही निवड प्रक्रिया विस्तृत असते . संरक्षण मंत्रालयाने कला , संस्कृती , चित्रकला , शिल्पकला , संगीत , वास्तुकला , नृत्यदिग्दर्शन इत्यादी क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींची एक तज्ज्ञ समिती स्थापन केली आहे , जी प्रस्तावांमधून चित्ररथ निवडण्यास मदत करते. ज्या चित्रांमध्ये किंवा डिझाइनमध्ये बदलासाठी सूचना देऊ शकता येतात अशांची तपासणी समितीकडून केली जाते . रेखाटन सोपे , रंगीत , समजण्यास सोपे असावे आणि अनावश्यक तपशील टाळण्यास सांगितले जाते . यामध्ये कोणत्याही लेखी विस्ताराची आवश्यकता नसावी अशीही सूचना केली जाते . चित्ररथामध्ये पारंपारिक नृत्य असल्यास ते लोकनृत्य असावे आणि वेशभूषा आणि वाद्ये पारंपारिक आणि अस्सल असावीत. प्रस्तावात नृत्याचा व्हिडिओ समाविष्ट करावा असेही सांगितले जाते .
एकदा मंजूर झाल्यानंतर , पुढील टप्पा म्हणजे सहभागींनी त्यांच्या प्रस्तावांसाठी त्रिमितीय मॉडेल्स आणणे , जे अनेक निकष लक्षात घेऊन अंतिम निवडीसाठी तज्ञ समितीद्वारे पुन्हा तपासले जातात . अंतिम निवड करताना समिती इतर घटकांसह दृश्य अपील , जनमानसावर होणारा परिणाम , चित्ररथाची कल्पना / थीम , संगीत सोबत या घटकांचे नियोजन पाहते . समिती ज्यांना निवडले आहे , त्यांनाच पुढील फेरीची माहिती देते . त्यानंतर सहभागाचे निमंत्रण पत्र दिले जाते .