
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा
मुंबई :- आता ‘महाभारत’ या पौराणिक मालिकेत श्रीकृष्णाची भूमिका साकारणाऱ्या नितीश भारद्वाजचा घटस्फोट झाला आहे. सध्या मनोरंजन विश्वात घटस्फोटाच्या बातम्या ऐकायला मिळत आहेत. नुकताच दाक्षिणात्य सुपरस्टार धनुष आणि ऐश्वर्याने विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. नितीश भारद्वाजने पत्नी स्मिता गटेपासून वेगळं होत असल्याचं स्पष्ट केलं आहे. 12 वर्षांच्या सुखीसंसारानंतर हे दोघेही विभक्त होत आहेत. या दोघांनाही दोन जुळ्या मुली असून या दोन्ही मुली आई स्मितासोबत इंदौरला राहतात.
नितीश भारद्वाजने 2019 मध्ये पत्नीपासून वेगळं होण्यासाठी मुंबईतील फॅमिली कोर्टात अर्ज केला होता. नितीश भारद्वाज म्हणाला,”घटस्फोट हा मृत्यूपेक्षाही पॉवरफुल असतो. जेव्हा तुम्ही अगदी एकटे होता तेव्हा याची अधिक जाणीव होते”, एवढंच मी सांगू इच्छितो. नितीश यांच्या पत्नी स्मिता गाटे या आयएएस अधिकारी आहेत. नितीशने स्मितासोबत दुसरे लग्न केले होते. 1991 मध्ये मोनिषा पाटील यांच्यासोबत नितीश लग्नबंधनात अडकला होता. ‘महाभारत’मध्ये नितीशने ‘कृष्णा’ची भूमिका साकारली होती. तेव्हा ते 23 वर्षांचे होते.