दैनिक चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी
गोविंद पवार
नांदेड :- माजी आ शंकर अण्णा धोंडगे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे काढण्यात आलेल्या मोर्चात त्यात तत्कालीन सरकारचा प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले होते त्याला उत्तर म्हणून प्रतापराव पाटील यांच्या समर्थकांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालया समोर माजी आ धोंडगे यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला यात सहा पदाधिकारी यांच्या विरुद्ध लोहा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ही घटना २०१६ ,मध्ये घडली होती.यातील सर्व जणांची लोहा न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. अशी माहिती वकील ऍड विलास चव्हाण लव्हेकर यांनी दिली
तत्कालीन शिवसेनेचे तालुकाप्रमुख व उपनगराध्यक्ष शरद पाटील पवार, तत्कालीन शहर प्रमुख तथा माजी उपनगराध्यक्ष छत्रपती धुतमल, उपजिल्हाप्रमुख बाळू पाटील कऱ्हाळे,पंचायत समिती उपसभापती नरेंद्र गायकवाड, विधानसभा संघटक,मिलिंद पवार यांनि तत्कालीन आमदार शंकर अण्णा धोंडगे याच्या पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. 2016 मध्ये ही घटना घडली या केस मध्ये कलम 143 भादवि आणि कलम135 मुंबई पोलीस कायदा अन्वये खटला दाखल करण्यात आला होता. या पदाधिकाऱ्यांनी कोणतीही पूर्व परवानगी न घेता बेकायदेशीररित्या एकत्रित जमा होऊन माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे व राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात घोषणा देऊन कापडाने तयार केलेल्या पुतळ्याचे दहन केल्याचा आरोप उपरोक्त जणांवर ठेवण्यात आला होता.
सदरील प्रकरणातील सबळ पुरावा न मिळाल्याने सहा ही जणांना निर्दोष सोडण्यत आले आरोपींचे वकील ऍड. विलास चव्हाण यांनि युक्तिवाद केला. आलेला साक्षीपुरावा आणि युक्तिवाद यांचा विचार करून आरोपिंची सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्री पि. बि. तौर यांनी केली. बाजू ऍड. विलास चव्हाण यांनी मांडली या निर्णया नंतर ऍड विलास चव्हाण यांचे पदाधिकारी यानी अभिनंदन केले व आभार मानले