
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा
मुंबई :- एखाद्या कलाकारासाठी त्याचा अभिनय आणि त्याची एखादी भूमिका हिच त्याची ओळख बनते. मालिका विश्वातील असचं एक गाजलेलं व्यक्तिमत्व म्हणजे अभिनेते शिवाजी साटम. शिवाजी साटम यांनी आजवर अनेक मराठी आणि हिंदी मालिका तसचं सिनेमांमधून प्रेक्षकांची मनं जिकंली आहेत. त्याचसोबत रंगभूमीवरील अभिनयातून त्यांनी प्रेक्षकांची दाद मिळवली. मात्र प्रेक्षकांच्या मनात घरं केलं ते त्यांच्या सीआयडी या शोमधील एसीपी प्रद्युमन या भूमिकेने. पण आता त्यांना काम मिळत नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
शिवाजी साटम यांनी नुकतीच हिंदुस्तान टाइम्सला मुलाखत दिली होती. यावेळी शिवाजी साटम यांनी त्यांना आता कामाच्या ऑफर्स मिळत नसल्याचे सांगितले आहे. “मला असं नाही म्हणायचं मला ऑफर्स मिळत नाहीत. आज माझ्याकडे एक-दोन ऑफर्स आहे. पण देखील हवे तसं नाहीत. मी मराठी रंगमंचावर काम केलं आहे. मला दमदार भूमिका करायला आवडतात.”,असे शिवाजी म्हणाले.