
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा
नवी दिल्ली :- भारतीयांनी कोरोनाविरुद्ध लढा कसा दिला ? यासंदर्भात बोलताना भारतीयांची इच्छाशक्ती कशी चांगली आहे, असं मोदी सांगत होते. मात्र अचानक टेलिप्रॉम्टरमध्ये काहीतरी तांत्रिक अडचण आली आणि तो बंद झाला. यानंतर पंतप्रधान मोदी भाषण देता देता थांबले, ते गोंधळून आणि थोड्या संतापलेल्या हावभावात स्क्रीनच्या उजवीकडे पाहू लागले.
नंतर त्यांनी निराश होऊन हात वर करत अखेर कानात हेडफोन लावत आपल्या भाषणामध्ये झालेल्या गोंधळानंतर समोरच्यांना ऐकू येतंय का हे विचारु लागले. टेलिप्रॉम्टर बंद झाल्यानंतर पंतप्रधानांना न अडखळता एक वाक्यही बोलता आलं नसल्याची टीका सोशल मीडियावरुन चांगलीच होऊ लागली आहे. सोशल मीडियावर या प्रकरणानंतर मिम्सची लाट आली आहे.