
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा
लाहोर :- इम्रान खान हे ‘धर्म शोषक’ असल्याचा आरोप प्रमुख विरोधी पक्षनेते शेहबाज शरीफ यांनी केला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केवळ राजकीय फायद्यासाठी आणि नागरिकांमध्ये द्वेष निर्माण करण्यासाठी धर्माचा वापर केला आहे. त्यांच्या कार्यकाळात देशाची आर्थिक स्थिती ढासळली असून हे अपयश झाकण्यासाठी ते सातत्याने धर्माचा आधार घेत आहे.
शेहबाज शरीफ म्हणाले, पंतप्रधान ज्या प्रकारे धर्माचा वापर आपले अपयश झाकण्यासाठी आणि चुकीच्या धोरणांमुळे देशात आलेल्या आर्थिक संकटाचा बचाव करण्यासाठी करत आहेत, ती खरोखर चिंताजनक आहे. यामुळे देशाचे जास्तीत जास्त नुकसानच होणार आहे. इम्रान हे चोरी केल्यानंतर मशिदीत लपल्यासारखे आहे. धर्माच्या मागे लपून ते इस्लामचे नाव बदनाम करत आहे, अशा शब्दांत त्यांनी निशाणा साधला.