
दैनिक चालु वार्ता
नंदुरबार प्रतिनिधी
संदिप मोरे
नंदुरबार :- नंदुरबार तालुक्यातील वरुळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक दयानंद जाधव यांच्या मुलगा दर्श यांच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त शाळेतील सर्व ६० विद्यार्थ्यांना स्वेटर वाटप व खाऊ वाटप करण्यात आले.शिंदे केंद्रातील जि.प.प्रा.शाळा वरूळ ता.नंदुरबार येथील उपक्रमशील शिक्षक दयानंद जाधव यांच्या संकल्पनेतील सामाजिक जाणिवेतून मुलाच्या पहिल्या वाढदिवसाला वायफळ पैसे खर्च न करता जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात थंडी वाढली आहे.त्यामुळे शाळेतील गरिबी विद्यार्थ्यांना थंडीपासून बचाव करण्यासाठी स्वेटरचे वाटप नंदुरबार तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी एस.एन. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी चौरे साहेब,केंद्रप्रमुख वानखेडे सर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गोरख वळवी, सरपंच जेहऱ्या वळवी मुख्याध्यापक अनिल माळी, केंद्रातील शिक्षक उमेश बेडसे, अविनाश डोंगरे, शिवशंकर देशमुख, ओम काळा, विकास शेंडगे, पांडुरंग निळे, विनोद सैंदाने, तोरवणे सर,संतोष एकलारे, डक सर शिक्षक व पालक उपस्थित होते.यावेळी गटशिक्षणाधिकारी एस.एन.पाटील यांनी शिक्षकांच्या नाविन्यपूर्ण उपक्रम बद्दल कौतुक करून शुभेच्छा दिल्या.गावस्तरावरुन कौतुक करण्यात येत आहे.