
दैनिक चालु वार्ता
परतूर प्रतिनिधी
मकर संक्रांतीनिमित्ताने शहरातील भाजी मंडी येथील कालिका देवी मंदिरात रविवारी रोजी कोरोनाचे काटेकोर पालन करत हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी परिसरातील महिलांनी एकत्र येत एकमेकांना विविध प्रकारची वाण देऊन मकरसंक्रांतिच्या शुभेच्छा दिल्या.रुक्मिणी सोपान जईद,सुवर्णा राऊत,इदुबाई कांबळे,सविता जईद,वंदना उडे,शालिनी लाळे,नीता जईद,कल्पना जईद,सारिका शिंदे,छाया जईद,जनाबाई पूड,चंद्रकला लाळे,वेणूबाई जईद आदी महिलांची यावेळी उपस्थित होती. दरम्यान, यावेळी कार्यक्रमात 500 महिलांना तिळगुळ,भेटवस्तू देण्यात आल्या.
फोटो- : परतूर येथे कालिका देवी मंदिरात मकरसंक्रांतीनिमित्त झालेल्या हळदीकुंकवाच्या कार्यक्रमात सहभागी महिला.