दैनिक चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी
गोविंद पवार
नांदेड :- नांदेड दक्षिण मतदार संघाचे कर्तव्यदक्ष लोकप्रिय आ. मोहन अण्णा हंबर्डे यांच्या अध्यक्षतेखाली नांदेड दक्षिण मतदार संघातील लोहा तालुक्यातील २४ गावातील पाणी पुरवठ्याची बैठक लोहा तहसील कार्यालयाच्या समन्वय समितीच्या सभागृहात संपन्न झाली यावेळी आ. मोहन अण्णा हंबर्डे यांनी अनेक विभागाच्या कामचुकार अधिकारी – कर्मचारी यांना धरले धारेवर. लोहा पंचायत समिती अंतर्गत नांदेड दक्षिण मतदार संघातील ग्रामीण पाणीपुरवठा उन्हाळी पाणी टंचाई उपाययोजना कृती आराखडा बैठक लोहा तहसील कार्यालयाच्या समन्वय समितीच्या सभागृहात बैठक दि.१७ जानेवारी रोजी पार पडली.
यावेळी उपविभागीय अधिकारी शरद मंडलिक लोहा पं.स.चे काँग्रेसचे गटनेते श्रीनिवास मोरे, तहसीलदार मुंढे,बीडीओ व्हावळे, पाणीपुरवठा विभागाचे अभियंता डिकळे , केंद्रे, महावितरणचे अभिय़ंता दंवडे, शेवडीचे सरपंच कैलास धोंडे, पांगरीचे सरपंच भरत कोपनर उपसरपंच माधव पाटील सोनखेडचे सरपंच अच्युत मोरे, सायाळचे सरपंच अण्णाराव पाटील पवार, शिवणी ( जामगा) चे सरपंच छत्रुघन महाराज स्वामी , मधुकर पाटील दिघे, दत्ता पाटील दिघे, दयानंद येवले, सुदर्शन शेबाळे, रामदास पाटील जामगे, तलाठी कदम, ग्रामसेवक मंगनाळे, पं. स. चे बी.जी. मुंडे,यांच्या सह २४ गावचे सरपंच, ग्रामसेवक ,तलाठी, आदी उपस्थित होते.
यावेळी आ. मोहन अण्णा हंबर्डे यांनी नांदेड दक्षिण मधील लोहा तालुक्यातील २४ गावांचा पाणीपुरवठ्यासहित विविध विकास कामांचा आढावा घेऊन उपाययोजना करण्याचे आदेश प्रशासनाला दिले. तसेच म. रा. विद्युत, महसूल, पाणीपुरवठा विभागाच्या अनेक गावांच्या तक्रारी बैठकी मध्ये अनेक गावांच्या सरपंचांनी केल्या यावेळी आ. मोहन अण्णा हंबर्डे यांनी अधिकारी- कर्मचारी यांना कडक शब्दात सुनावले जनतेचे कामे वेळेवर करा मुख्यालयी रहा लोकप्रतिनिधी, सरपंचाचे फोन उचलत रहा पुढच्या बैठकी पर्यंत सर्व कामे सुरळीत झाली पाहिजे अन्यथा हक्क भंगाची कारवाई करण्यात येईल असा कडक शब्दात इशारा दिला.