
दैनिक चालु वार्ता
मंठा प्रतिनिधी
सुशिल घायाळ
मंठा :- दि.19 मंठा नगरपंचायत निवडणूक 2021-22 एकूण 17 जागेसाठी निवडणूक घेण्यात आली होती. यापैकी शिवसेना एकूण 12 जागा मिळून एक हाती सत्ता मिळवण्या मध्ये यशस्वी ठरून शिवसेना जिल्हाप्रमुख श्री.ए.जे.बोराडे यांनी पुनश्च एकदा मंठा नगरपंचायत वर शिवसेनेचा भगवा झेंडा फडकवला. तर उर्वरित जागेवर भारतीय जनता पार्टी पक्षाला 2 जागेवर समाधान मानावे लागले. व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे 2 उमेदवार विजयी झाले. तर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी पक्षाला 1 जागेवर समाधान मानावे लागले.
विजयी उमेदार यांना एकूण पडलेले मतदान असे. 1) बोराडे अच्युत आनंदराव 513 शिवसेना, 2)पठाण बाज मोहम्मद खा गुलाम 227 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,3) शेख साजेद जलील 303 भारतीय राष्ट्रीय काँग्रेस,4) राठोड नंदा उत्तमराव 695शिवसेना, 5) बोराडे दिपक आसाराम 391 शिवसेना,6) दवणे यमुना शेषनारायण 300 भारतीय जनता पार्टी,7) वाघमारे छाया अरुण 392 शिवसेना,8) खंदारे अशोक रावसाहेब 593 भारतीय राष्ट्रीय काँग्रेस,9) खाटीक इरमसबा रशीद 554 शिवसेना,10) बोराडे मीना सचिन बिनविरोध शिवसेना,11) बागवान खय्युम यासीन 506 शिवसेना,12) बोराडे वंदना वैजनाथ 986 शिवसेना,13) बोराडे मीरा बालासाहेब 510 शिवसेना,14) बोराडे सुषमा प्रदीप 558 शिवसेना,15) बोराडे सरोजा प्रल्हाद 329 शिवसेना,16) बोराडे शोभा प्रसाद 492 भारतीय जनता पार्टी,17) सुर्यवंशी विकास रेणुकादास 343 शिवसेना मंठा परिसरातील नागरिकांनी सर्व विजयी उमेदवाराचे अभिनंदन केले.