दै.चालु वार्ता
अर्धापूर प्रतिनिधी
मन्मथ राजेश भुस्से
लखीमपुर खीरी येथील शेतकरी आंदोलनातील सहभागी शेतकरी व पत्रकार यांच्यावर निर्दयीपणे स्वतःची जीप मस्तवालपणे चालवणाऱ्या आशिष मिश्रा या आरोपीवर कार्यवाही करावी व केंद्रीय गृहराज्यमंत्री मिश्रा यांचा राजीनामा घ्यावा तसेच काँग्रेस पक्षाचे नेत्या प्रियंका गांधी व विरोधी पक्षांच्या नेत्यावर बेकायदेशीरपणे अटक व दबावाचे राजकारण करणाऱ्या मोदी भाजपा व संघाच्या विरोधात आज (महाविकास आघाडी)महाराष्ट्र बंदमध्ये अर्धापूर शहर तसेच तालुक्यातील सर्व नेते कार्यकर्ते येथे सहभाग नोंदवला.
यावेळी मोदी भाजपा व संघाच्या विरोधात घोषणा देऊन निषेध व्यक्त केला. या अंदोलनामध्ये काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी,माकप,शेकाप,मानवी हक्क अभियान,पिपल्स रिपब्लिकन पक्ष, काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते….