
दैनिक चालु वार्ता
म्हसावद सर्कल प्रतिनिधी
सुनिल पाटिल
म्हसावद :- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत सुरु करा अशा आशयाने निवेदन आज रोजी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद शाखा शहादाच्या वतीने शहादा तहसीलदार कुलकर्णी यांना देण्यात आले. संपूर्ण महाराष्ट्रात करोना -19 या संसर्गजन्य आजाराचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बंद करण्याचा आदेश राज्य शासनाने पारित केले आहे परंतु या आदेशाने विद्यार्थ्यांचा अतोनात शैक्षणिक नुकसान होत आहे. म्हणून आज रोजी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद शहादा तालुका शाखेच्या वतीने दुर्गम भागात अथवा ग्रामीण भागातील परिसरात करोना पेशंट नाही.
अशा सर्वसादारन परिसरात विद्यार्थ्यांसहित शाळा सुरू करण्यात याव्या जेणेकरून विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात टिकून राहण्यात मदत होईल. म्हणून शाळा सुरू करण्याबाबतच्या आशयाचे सदर निवेदन देण्यात आले. निवेदन देतांना शिक्षक परिषदेचे तालुकाध्यक्ष श्री सिध्दार्थ बैसाने , तालुका कार्यवाह श्री संजय साळी , जिल्हा उपाध्यक्ष श्री रावसाहेब बावा , जिल्हा मुख्य सल्लागार श्री हिरालाल पाटिल , तालुका कार्याध्यक्ष रमेश वाडीले , तालुका कार्यालयीन मंत्री प्रकाश लंबोळे , तालुका संगठन मंत्री अनिल सोनवणे , तालुका उपाध्यक्ष नवलसिंग राजपूत , मनोहर सैदाने , तालुका संपर्क प्रमुख संजय गिरासे , तालुका सह संपर्कप्रमुख चंद्रकांत पाटील , तालुका कार्याध्यक्ष राजेंद्र वाडीले , प्रमोद पाटिल , व दिनकर वसावे , तालुका प्रसिध्दी प्रमुख अनुप राठोड आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते .