
दैनिक चालु वार्ता
पारनेर प्रतिनिधी
विजय उंडे
पारनेर :- पारनेर तालुक्याचे व संपूर्ण नगर जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या पारनेर नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या दोन्ही पक्षांना बहुमतापर्यंत पोहोचता आले नाही. १७जागांसाठी काल झालेल्या मतदानात ८७.६६,%मतदान झाले. आज दि.१९रोजी सकाळी १०.००वाजता प्रत्यक्ष मतमोजणी सुरू झाली.निवडणूकीपुर्वी केलेल्या आरोप-प्रत्यारोपांमुळे ही निवडणूक दोन्ही पक्षांसाठी प्रतिष्ठेची होती.परंतु पारनेरच्या जनतेने कुणालाही स्पष्ट बहुमत न देता त्रिशंकू परिस्थिती निर्माण केली आहे.
या निवडणुकीत माजी आमदार विजयराव औटी यांच्या पत्नी सौ.जयश्रीताई औटी मात्र पराभूत झाल्या आहेत.शिवसेनेसाठी हा फार मोठा धक्का मानला जात आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस_७, शिवसेना-६, पारनेर नगर विकास आघाडी-२,भाजपा.-१तर अपक्ष-१जागेवर निवडून आले आहेत. स्पष्ट बहुमत न मिळाल्याने दोन्ही पक्षांना शहर विकास आघाडी,भाजप.व अपक्षांवर अवलंबून राहावे लागणार आहे.हे सर्व आपलं वजन कुणाच्या पारड्यात टाकतात हे पहाणे मनोरंजक ठरणार आहे.
प्रभाग क्रमांक आणि विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे:-प्रभाग१- शालुबाई कांतीलाल ठाणगे (शिवसेना),प्रभाग २-सुप्रिया सुभाष शिंदे (राष्ट्रवादी काँग्रेस)प्रभाग ३-योगेश अशोक मते (अपक्ष),प्रभाग ४-नवनाथ तुकाराम सोबले (शिवसेना),प्रभाग ५-नितीन रमेश अडसूळ (राष्ट्रवादी काँग्रेस),प्रभाग६-निता विजय औटी (राष्ट्रवादी काँग्रेस),प्रभाग ७-विद्या अनिल गंधाडे,(शिवसेना),प्रभाग ८-भूषण उत्तम शेलार (पारनेर शहर विकास आघाडी),प्रभाग ९-हिमानी रामजी नगरे (राष्ट्रवादी काँग्रेस),प्रभाग १०-सुरेखा अर्जुन भालेकर (पारनेर शहर विकास आघाडी),प्रभाग ११-अशोक फुलाजी चेडे (भाजपा.),प्रभाग १२-विद्या बाळासाहेब कावरे (राष्ट्रवादी काँग्रेस),प्रभाग १३-विजय सदाशिव औटी (राष्ट्रवादी काँग्रेस),प्रभाग १४-निता देवराम ठुबे (शिवसेना),प्रभाग १५-जायदा राजू शेख (शिवसेना),प्रभाग १६-युवराज कुंडलीक पठारे (शिवसेना),प्रभाग १७-प्रियांका सचिन औटी (राष्ट्रवादी काँग्रेस).