
दैनिक चालु वार्ता
गंगापूर प्रतिनिधी
सुनिल झिंजूर्डे पाटिल
गंगापूर :- गंगापूर तालुक्यातील सहकारी साखर कारखाना येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा पुनर्स्थापित करणे व गंगापूर सहकारी साखर कारखान्याचे बंद पडलेल्या चे चेअरमन आमदार प्रशांत बंब व त्यांचे सहकारी रामेश्वर मुंदडा यांनी मागच्या अडीच वर्षापूर्वी पुतळा दुरुस्ती नेला होता, अद्यापपर्यंत सुशोभीकरण झाले नाही व पुतळाही बसवण्यात आलेला नाही तरी येत्या चार दिवसात जर पुतळा बसवण्यात आला नाही तर आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.
गंगापूर शहरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नूतनीकरण केलेल्या विविध चौकाच्या महापुरुषांच्या स्मारकांचे झालेल्या विटंबना बाबत गंगापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक यांचे सुशोभिकरण करण्यात आले .पण सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी महापुरुषांचे नाव छोटे केले व आमदार यांचे नाव मोठे टाकण्यात आले त्यांनी महापुरुषांची विटंबना केली .तरी लवकरात लवकर ते नाम फलक बदलून दुरुस्त करण्यात यावे, अन्यथा शनिवारी आंदोलन करण्यात येईल. दारिद्र रेषेखालील प्रमाणपत्र वाटपाबाबत गंगापूरचे आमदार प्रशांत बंब व त्यांचे अरित फाऊंडेशनचे स्वयंसेवक हे सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर दबाव आणून बोगस रित्या दारिद्र रेषा खालचे प्रमाणपत्राचे वाटप करत आहेत.
तरी हा गैरकारभार थांबवावा व दोषी अधिकारी यांचा वर करवाई करण्यात यावी. अन्यथा त्यांच्याविरुद्ध आंदोलन करण्यात येईल. या सर्व बाबींचे निवेदन देण्यात आले या वेळी उपस्थित संतोष माने, संजय जाधव, वाल्मीक शिरसाठ, विश्वजित चव्हाण, फैसल चाऊस, अमोल जगताप, सुरेश नेमाडे, योगेश पाटील, राकेश कळसकर, नवनाथ कानडे, सचिन विधाटे,आनंता कुमावत,कैलास खाजेकर, चंद्रकांत चव्हाण,सोपान देशमुख, युनूस शेख, रफिक पटेल, मनोज वरकड, चंद्रशेखर परभने, काशिनाथ धरपले,कृष्णा वल्ले, समाधान गायकवाड, भाऊसाहेब गवळी, गणेश चव्हाण, शारुक पटेल,राजू जाधव कृष्ण ताठे, मंगेश साध्ये, पोपट खरात, सतिश पाटील, असिफ मन्सूरी,योगेश आवारे, शिवम गायके, अजय सोनवणे, योगेश शेजुळ, सचिन खाजेकर, कल्याण खाजेकर, गोविंद जाधव, काकासाहेब जाधव, संतोष शिंदे, सिताराम गायकवाड, गणेश शेजुळ, ऋषिकेश पाटे, सार्थक खैरे.