दैनिक चालु वार्ता
पुणे शहर प्रतिनिधी
गुणाजी मोरे
पिंपरी :- मावळ तालुक्यातील उर्से टोलनाका येथे गुरुवारी (दि. २०) सकाळी साडेअकराच्या सुमारास दरोडेखोरांनी पोलिसांच्या अंगावर गाड्या घातल्या. यात एक पोलीस जखमी झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेश येथील अट्टल गुन्हेगार दोन वाहनांमधून महामार्गावर जाणार असल्याची माहिती पिंपरी- चिंचवड पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी उर्से टोल नाक्यावर सापळा रचला. टोलनाक्यावरून जात असलेल्या संशयित वाहनाला अडविण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला. त्यावेळी दरोडेखोरांनी थेट पोलिसांच्या अंगावर गाड्या घालण्यास सुरुवात केली. पण पोलिसांनी जिवाची पर्वा न करता सहा आरोपींना शिताफिने ताब्यात घेतले. तसेच तीन ते चार जण डोंगरामध्ये पळून गेले. याबाबत माहिती मिळताच पोलिसांचा मोठा ताफा घटनास्थळी दाखल झाला.