
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी पुणे शहर
गुणाजी मोरे
माजी पुरुष सरपंचाकडून तीन महिन्यांच्या गर्भवती महिला वनरक्षकाला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याची गंभीर घटना महाराष्ट्रातील साताऱ्यातील पळसवडे इथे घडली होती. या घटनेची गंभीर दखल राज्य महिला आयोगाने घेतली आहे. आज सकाळी आरोपीला अटक करण्यात आली आहे. कायद्याला कठोरपणे सामोरे जावे लागेल.
अशी कृत्ये खपवून घेतली जाणार नाहीत, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्राचे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे
सातारा येथील पळसवडे गावात वनमजुराच्या बदलीच्या वादातून गर्भवती वनपरिक्षेत्रपालाला मारहाण केल्याप्रकरणी पुरुषाला आणि त्याच्या पत्नीला अटक केली आहे. आरोपी हा माजी गावप्रमुख असून स्थानिक वन समितीचा सदस्य आहे.
खारगाव जंगलातील वनरक्षक सिंधू सानप हिने आरोप केला आहे की, जेव्हापासून ती ड्युटीवर रुजू झाली तेव्हापासून आरोपी तिला धमकावत आणि पैशाची मागणी करीत होता. बुधवारी (ता. १९) त्यांनी मला मारहाण केली. कामावरून परतत असताना पतीला चप्पलने मारहाण केली. सानप या तीन महिन्यांची गर्भवती आहे.