
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी पुणे शहर
गुणाजी मोरे
पुणे :- उरळीकांचन गावात एका शेतकऱ्याने दोन मजली बंगल्याच्या टेरेसवर चक्क द्राक्षाची बाग फुलवली. द्राक्ष शेतात पिकवली जातात हे सर्वांनाच माहिती आहे. परंतु हीच द्राक्ष एखाद्या घराच्या गच्चीवर पिकवली जातात म्हटलं तर कुणाचा विश्वास बसेल का ? असं प्रत्यक्षात घडलय. पुण्यापासून 30 ते 35 किमी अंतरावर असणाऱ्या उरळीकांचन गावात एका शेतकऱ्याने दोन मजली बंगल्याच्या टेरेसवर चक्क द्राक्षाची बाग फुलवली.
उरुळी कांचन परिसरात राहणारे 58 वर्षीय भाऊसाहेब कांचन त्यांचा पारंपरिक शेती व्यवसाय आहे. उरुळी कांचन परिसरात त्यांची सव्वा तीन एकर शेती आहे. त्यांनी दोन एकरात ऊस, तर दहा गुंठ्यात नारळ, सुपारी, आवळा, जांभूळ, पेरू, आंबा, डाळिंब, चिकू अशा वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांची त्यांनी लागवड केली. कांचन यांनी साधारण सहा वर्षांपूर्वी घराच्या बाजूला द्राक्षाच्या दोन रोपांची लागवड केली होती. त्यानंतर त्यांनी टेरेसवरच द्राक्षाची बाग फुलवली.