
दैनिक चालु वार्ता
मुखेड प्रतिनिधी
संघरक्षित गायकवाड
मुखेड :- सामाजिक कार्यकर्ते उत्तमराव पाटील वडजे यांची जिल्हा परिषद नांदेड यांच्याकडे आमरस्त्यावर खडा पडला बुजवण्यात यावे अशी निवेदन देऊन मागणी करण्यात आली. मुखेड तालुक्यातील मौजे धामणगाव दि ७/७/२०२१ रोजी अतिवृष्टीमुळे आमरस्त्यावर ४*५ चा मोठा खड्डा पडला आहे धामणगाव हे राजकीय पटलावरील गाव हजरत सय्यद बाबु पिर दर्गाह उरूस संदल साठी प्रसिद्ध असले. गाव असल्यामुळे येथील हजरत सय्यद बाबु पिर उर्ष संदल दर्गाह या ठिकाणी महाराष्ट्र , आंध्रप्रदेश , तेलंगणा , कर्नाटक , येथील राज्यातून अनेक हिंदू मुस्लिम बांधवांनी नवस फेडण्यासाठी व कंदोरीसाठी येत असतात या आमरस्त्यावर खडा पडल्यामुळे येणाऱ्या काळात मोठा अपघात होण्याची दाट शक्यता असल्यामुळे त्या
संदर्भात वेळो वेळी जि. प.उपविभाग मुखेडला सुचना दिले होते परंतु काही हालचाल होत नही त्यामुळे दि १७/०१/२०२२ मा . जिल्हाधिकारी कार्यालय येथे लेखी तक्रार अर्ज दिला आहे शासनाने लक्ष दिले नाही तर जिल्हाधिकारी कार्यालय समोर आंदोलन करण्याचा इशारा धामणगाव मधील गावकऱ्यांनी दिला आहे. तरी जिल्हाधिकारी साहेबांनी योग्य ती कारवाई करून सहकार्य करावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते उत्तमराव पाटील वडजे व सरपंच विनोद पाटील चंदापुरे धामणगावकर यांनी केले आहे.