
दैनिक चालु वार्ता
पालघर प्रतिनिधी
प्रा. मिलिंद खरात
वाडा :- आदिवासी मुक्ती मोर्चा सामाजिक संघटना वाडा शहर कमिटीच्या वतीने वाडा नगरपंचायतला विविध विकास कामांच्या मागण्यांसाठी ३१ जानेवारी २०२२ रोजी लाक्षणिक उपोषणाचा इशारा. वाडा नगरपंचायत स्थापनेपासुन आजपर्यत जवळ – जवळ चार वर्षाचा कालावधी पुर्ण होऊन सुद्धा एकही विकास काम वाडा नगरपंचायत क्षेत्रात झालेले नाही. वाडा शहरच्या व आजुबाजुच्या पाड्यांवर अनेक समस्या आहेत. त्यामुळे येत्या सोमवार दि. ३१ जानेवारी २०२२ रोजी खालील विकास कामे होण्याकामी वाडा नगरपंचायत कार्यालया समोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषणास बसणार आहोत.
मागण्या :-
१) वाडा शहरातील आजुबाजुच्या पाड्यांवरील कुडाची , माती , विटांच्या मोडकलीस आलेल्या घरांची पाहणी करुन लाभार्थांना घरकुलाचा लाभ मिळवुन देणे.
२) वाडा शहरातील सर्व मंजुर अंतर्गत रस्तांची ४७ कामे त्वरीत सुरु करणे.
३) वाडा शहरातील सर्व १७ प्रभागात स्ट्रीट लाईटची व्यवस्था करणे व आवश्यकता वाटल्यास महावितरणाकडे पत्र व्यवहार करणे.
४) वाडा शहरातील खंडेश्वरी नाका सावित्री नगर , ठाणगेपाडा , मोहंड्याचापाडा , श्रीराम नगर , कोंबपाडा , सवरापाडा येथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे.
५) वाडा शहरातील खंडेश्वरी नाका सागर पेट्रोल पंपाच्या पुढे टाकण्यात येणारा धनकचरा त्वरीत बंद करणे.
या सारख्या विविध विकास कामे लवकरात सुरु करणे बाबत आदिवासी मुक्ती मोर्चा सामाजिक संघटना वाडा शहर कमिटीच्या वतीने वाडा नगरपंचायतला लाक्षणिक उपोषणाचा इशारा देण्यात आला. यावेळी वाडा शहर कमिटीचे अध्यक्ष श्री. विनोद कोंब,सचिव नरेश ठाणगे , वाडा तालुका कमिटी सदस्य दयानंद हारळ ,वाडा शहर संघटक वैभव भोमटे, किरण कोंब व इतर सदस्य उपस्थित होते.