
दैनिक चालु वार्ता
परमेश्वर वाव्हळ
पिंपरी प्रतिनिधी
पिंपरी :- रिपब्लिकन सेना संस्थापक अध्यक्ष सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या आदेशाने व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सागर डबरासे यांच्या मार्गदर्शनाने पिंपरी चिंचवड शहर झोपडपट्टी सेल सेक्टर नंबर २२ आंबेडकर वसाहत निगडी या ठिकाणी महिला शाखा व युवक शाखांचे उद्घाटन सागर डबरासे यांच्या हस्ते व पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मा. संजय देखणे यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी नवनियुक्त पुणे जिल्हा अध्यक्ष किरण किर्ते व राजू गायकवाड, अध्यक्ष झोपडपट्टी सेल, पिंपरी-चिंचवड शहर शहराध्यक्ष धुराजी शिंदे, मुकुंद रणदिवे, कार्याध्यक्ष पिं. चिं शहर दत्ताभाऊ गायकवाड, मार्गदर्शक पुणे जिल्हा उपाध्यक्ष सदानंद गवई, जिल्हा महासचिव संदीप रंधवे, जिल्हा कोषाध्यक्ष संदीप साळुंखे, भीमराव सुरवसे ज्येष्ठ नेते रमेश कांबळे, शहरसंघटक केशव गायकवाड, प्रशिद्धीप्रमुख विष्णु बोर्डे, शहर सचिव छाया शिरसागर, महिला शाखाअध्यक्षा शोभा पाटील, शाखा उपाध्यक्ष मुमताज शेख, महासचिव व इतर स्थानिक महिला व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.