
दैनिक चालु वार्ता
औरंगाबाद जिल्हा प्रतिनिधी
अनिकेत संजय पुंङ
औरंगाबाद :- शहरात एकाच आठवड्यात दुसरा खून उघडकीस आला आहे . काही दिवसांआधी मिसारवाङी मधील ” गॕंगवाँर प्रकरण ” ताजे असतांनाच आज पुन्हा एकदा नव्याने टीव्ही सेंटर भागातील शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या आवारात हा खून झाला आहे. दगडाने ठेचून खून केल्यानंतर मयताचे गुप्तांग जाळण्यात आले आहे. सिद्धार्थ साळवे असे मयत व्यक्तीचे नाव आहे . या खुनाबाबत अद्याप कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही . जुन्या वादातून हा खून झाला असावा असा संशय पोलीस व्यक्त करत आहेत . तसेच एका पेक्षा अधिक मारेकऱ्यांचे हे कृत्य असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे . तसेच खून होऊन २४ तासाहून अधिक वेळ झाला असावा अशी माहिती देखील समोर येत आहे .
टवाळखोरात ‘ डे-नाईट ’ अशी ओळख
छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याच्या मागील बाजूस असलेल्या या मैदानात नेहमीच टवाळखोर व नशेखोरांचा वावर असतो . या मैदानास ‘ डे-नाईट ’ असे नामकरण देखील टवाळखोरांनी केले आहे . भागातील नागरिकांनी वारंवार याबाबत तक्रारी करून देखील पोलिसांनी योग्य पाऊले न उचलल्याने ही वेळ आली असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिक देत आहेत .