
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी पेठवडज
बाजीराव गायकवाड
नांदेड :- इयत्ता 1 ली ते 12 वी चे वर्ग दिनांक 24 जानेवारी 2022 पासून सुरु करण्यास सातत्याने मागणी करण्यात येत असल्याने स्थानिक परिस्थितीचा विचार करुन महानगरपालिका क्षेत्रात महानगरपालिका आयुक्त व राज्यातील इतर भागात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांना शाळा सुरु करण्याचे अधिकार प्रदान करण्यात आले आहे. त्याअर्थी, आपत्ती व्यवस्थापन कायदा अन्वये प्राप्त अधिकारानुसार, नांदेड जिल्ह्यातील कोवीड -19 ची परिस्थिती पाहता व 15 ते 18 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण पाहता दिनांक 24 जानेवारी 2022 पासून नांदेड जिल्ह्यातील सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या इयत्ता 9 वी ते 12 च्या शाळा सुरु करण्यास मान्यता देत आहे.
उपरोक्त दिनांक 20 जानेवारी 2022 च्या शासन निर्णयातील मार्गदर्शक सूचना तसेच शासनाने वेळावळी संदर्भाधीन परिपत्रकान्वये दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. तसेच वेळोवेळी या कार्यालयाकडून कोवीड-19 संदर्भात देण्यात आलेल्या सर्व सुचनांचे काटेकोरपणे पालन करावे. तसेच 15 ते 18 वर्ष वयोगटातील सर्व विद्यार्थ्यांचे लसीकरण 100% पूर्ण करावे.अशी माहिती जिल्हाधिकारी विपीन इटणकर यांनी दिली आहे.