
दैनिक चालु वार्ता
तालुका प्रतिनिधी आर्णी
श्री.रमेश राठोड
आर्णी :- आर्णि तालुक्यातील सावळी सदोबा येथे सर्व पत्रकार बांधवांच्या वतीने ग्रामीण पत्रकार संघटनेचे सरसंस्थापक पि.एल सिरसाठ स्मृतिदिन साजरा करण्यात आला,प्रथम पि.एल सिरसाठ यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना पुष्पमाळ अर्पण करण्यात आली,यावेळी प्रेस क्लब सावळीचे अध्यक्ष रुपेश भाऊ खरतडे यांनी ग्रामीण पत्रकार संघटनेचे जनक पि.एल सिरसाठ यांच्या जिवन कार्याबद्दल प्रकाश टाकण्यात आला,पि.एल सिरसाठ यांचे विचारo सर्व पत्रकार बांधवांनी अंगीकारावे व आपल्या पत्रकारिता क्षेत्रामध्ये निर्भीडपणे लिखाण करून समाजाला न्याय मिळवून द्यावा असे मत रुपेश भाऊ खरतडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले,यावेळी उपस्थित सावळी प्रेस क्लबचे उपाध्यक्ष राम पवार, मोहम्मद सर्वे,सुरेश राठोड,प्रमोद कोट्टावार,सुरेश पवार,दुर्गेश कर्नेवार,आसिफ खान,श्रीकांत देशमुख,योगेश बुटले, जे.बि.पठान,अमिन चव्हाण,राहुल राऊत,रमेश राठोड सह पत्रकार बांधव उपस्थित होते