
दैनिक चालु वार्ता
नंदुरबार प्रतिनिधी
संदिप मोरे
नंदुरबार :- शहादा येथील मनसे कार्यालय येथे शहादा आणि धडगाव तालुका व शहर कार्यकारिणी मनसे नंदुरबार जिल्हाध्यक्ष राजेश्वर सामुद्रे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन जाहीर करण्यात आली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार, पक्ष निरीक्षक तथा राज्य उपाध्यक्ष विनयजी भोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली मनसे नंदुरबार जिल्हाध्यक्ष राजेश्वर सामुद्रे यांच्या हस्ते नियुक्ती करण्यात आली.
शहादा तालुका अध्यक्ष- विशाल पाटील, शहादा तालुका सचिव-अमेय राजहंस, शहादा शहर अध्यक्ष-सुहास पाटील, शहर उपाध्यक्ष- रोहित खैरनार, शहादा शहर सचिव-कौस्तुभ मोरे अशी शहादा तालुका आणि शहर कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
धडगाव तालुका अध्यक्ष-अंतरसिंग पावरा, धडगाव तालुका उपाध्यक्ष-किशोर पावरा, धडगाव तालुका सचिव- देविदास पावरा, धडगाव शहर अध्यक्ष आपसिंग पावरा, धडगाव शहर उपाध्यक्ष सुरेश पावरा, अशी धडगाव तालुका आणि शहर कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून अक्कलकुवा आणि तळोदा कार्यकारिणी लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे सामुद्रे यांनी सांगितले यावेळी माजी जिल्हा उपाध्यक्ष भालेराव पटले हे सुद्धा उपस्थित होते