
दैनिक चालु वार्ता
औरंगाबाद प्रतिनिधी
मोहन आखाडे
आरोग्य मंत्रालयाने मुलांच्या मास्क वापराबाबत नवी नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार 5 वर्षांखालील मुलांना मास्क वापरण्याची सक्ती नसल्याचं सांगण्यात आलं आहे.
5 वर्षांपेखा कमी वयाच्या मुलांसाठी मास्कची शिफारस केलेली नाही. तसेच 6 ते 11 वयोगटातील मुलं पालकांच्या देखरेखीखाली मास्कचा योग्यरित्या वापर करु शकतात, असं या नियमावलीमध्ये म्हटलं आहे.
‘या’ व्यक्तींना मास्क घालुन गरजेचं :-
केंद्रीय आरोग्य विभागाने म्हटलंय की, 12 वर्ष आणि त्याहून अधिक वयाच्या व्यक्तींनी मास्क घालणं गरजेचं आहे. कोरोना विषाणू आणि त्याच्या ओमायक्रॉन व्हेरियंटमुळं संसर्गाचं वाढतं प्रमाण लक्षात घेऊन हे मार्गदर्शक तत्वे जारी केले आहेत.