
दैनिक चालु वार्ता
खानापूर प्रतिनिधी
उमाकांत कोकणे
देगलूर :- दरवर्षीप्रमाणे यंदाही हिरकणी महिला ग्रुप साईनगर च्या वतीने मकर संक्रांत निमित्ते हळदी कुंकू श्रीकृष्ण चा वान देण्यात आला.साई नगर परिसरातील तसेच साधना नगर, आनंद नगर,शांती नगर,एकता नगर,शारदा नगर या परिसरातील सर्व भगिनी मोठया प्रमाणात कार्यक्रमास उपस्थित होते.यावेळी 400 महिला उपस्थित होते. या कोरोनाच्या काळात कोरोनाच्या नियमांचे पालन म्हणून आलेल्या प्रत्येक महिला भगिनींना मास्क वाटप करण्यात आले व सॅनिटायजर चा वापर करूनच महिलांना कार्यक्रमात प्रवेश देण्यात आले.याप्रसंगी हिरकणी महिला ग्रुपच्या महिला भगिनींनी मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या व यानिमित्त महिलांना विचारांची देवाण घेवाण करता आली.
यावेळी सर्व महिलांची दिलखुलास चर्चा रंगली होती.हा कार्यक्रम दिवसभर चालू होता.कोरोनाच्या नियमांचे पालन करून प्रत्येक तासाला 40 महिलांना बोलावून वाणाची देवाणघेवाण करण्यात आली. महिला भगिनींना हळदीकुंकू लावून वानामध्ये श्रीकृष्ण वान(गंज,रवी,दही पॅकेट) देण्यात आले.नंतर त्यांना अल्पोउपहार व केशर दूध देण्यात आले.अशा प्रकारे सर्व परिसरातील महिलांनी मकर संक्रांतीच्या निमित्त साधून वान देण्याच्या कार्यक्रमाचा आनंद लुटला.व सर्व महिलांचे हिरकणी महिला ग्रुपच्या वतीने आभार मानण्यात आले.तसेच या कार्यक्रमाचे आयोजन सौ.गोदावरी डांगे,सौ.राजश्री मुधोळकर, सौ.जयश्री दाऊलवार,सौ.लता गिरी,सौ.संध्या मुंडकर,सौ.सुनीता दरबस्तवार,सौ.सुप्रिया दाऊलवार,सौ.शोभा मैलागिरे, सौ.शोभा मुरडे आदी महिलांनी केले आहे.